या कंपनीच्या शेअरची विक्रमी दौड ; महिनाभरात २० टक्क्यांनी झालीय वाढ - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, June 17, 2021

या कंपनीच्या शेअरची विक्रमी दौड ; महिनाभरात २० टक्क्यांनी झालीय वाढ

https://ift.tt/3xGkXED
मुंबई : फास्टफूडमधील आघाडीची कंपनी जुबिलंट फूडवर्क्सच्या शेअरने बुधवारी रेकॉर्ड स्तर गाठला. भांडवली बाजारात जुबिलंट फूडवर्क्सचा शेअर ५ टक्क्यांनी वधारला होता. या शेअरने आज ३३३१ रुपयांचा उचांकी स्तर गाठला आहे. मार्चच्या तिमाहीत कंपनीच्या नफ्यात तीनपटीने वाढ झाल्यानंतर या कंपनीच्या शेअरने भांडवली बाजारात दमदार कामगिरी केली आहे. जुबिलंट फूडवर्क्सच्या शेअरमध्ये गेल्या महिन्यातभरात २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. याच काळात सेन्सेक्स ८ टक्क्यांनी वधारला आहे.जुबिलंट फूडवर्क्सने मार्चच्या तिमाहीत १०५.३० कोटींचा नफा कमावला आहे. गतवर्षाच्या तुलनेत यंदा कंपनीच्या नफ्यात तीनपटीने वाढ झाली. तसेच कंपनीच्या महसुलात १४.२ टक्के वाढ झाली आहे. कंपनीला जानेवारी ते मार्च या तिमाहीत १०३८ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीला ३२.५३ कोटींचा नफा मिळाला होता. यंदाच्या चांगल्या कामगिरीमुळे कंपनीने ६ रुपये प्रती शेअर लाभांश देण्याची शिफारस केली आहे. आजच्या सत्रात जुबिलंट फूडवर्क्सच्या शेअरने ३३३१.८५ रुपयांची सर्वोच्च पातळी गाठली. या शेअरमध्ये दिवसभरात ५ टक्के वाढ झाली होती. बाजार बंद होताना तो १.७१ टक्क्यांच्या वाढीसह ३२२९.७५ रुपयांवर बंद झाला. ११ जून रोजी जुबिलंट फूडवर्क्सने ३२५०.१५ रुपयांचा उच्चांक नोंदवला होता. आर्थिक वर्षाचा विचार केला तर २०२०-२१ मध्ये कंपनीचे उत्पन्न १५.७ टक्क्यांनी कमी होऊन ३३११.८७ कोटी झाले. २०१९-२० मध्ये कंपनीला ३९२७.२७ कोटीचे उत्पन्न मिळाले होते. जानेवारी ते मार्च या तिमाहीत कंपनीने ५० नवीन रेस्तरॉं सुरु केले. याच काळात ४ डॉमिनोज पिझ्झा स्टोअर बंद केले. ३१ मार्च २०२१ अखेर २९३ शहरांमध्ये कंपनीचे १३६० रेस्तरॉं आहेत.