पोलीस अधिकाऱ्याच्या घरात घुसून दहशतवाद्यांचा बेधुंद गोळीबार, कुटुंब उद्ध्वस्त - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, June 28, 2021

पोलीस अधिकाऱ्याच्या घरात घुसून दहशतवाद्यांचा बेधुंद गोळीबार, कुटुंब उद्ध्वस्त

https://ift.tt/3dm6dTl
: जम्मूत रविवारी करण्यात आलेल्या ड्रोन हल्ल्यानंतर २४ तासांच्या आतच दहशतवाद्यांनी काश्मीरच्या भागात विशेष माजी पोलीस अधिकारी फय्याज अहमद यांच्यासहीत पत्नीची गोळ्या घालून हत्या केलीय. जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी घरात घुसून एका माजी (SPO) आणि त्याच्या पत्नीही हत्या केलीय. तर या जोडप्याची अल्पवयीन मुलगी या गोळीबारात गंभीर जखमी झालीय. रविवारी रात्री ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माजी विशेष पोलीस अधिकारी फय्याज अहमद यांच्या घरावर दहशतवाद्यांनी रात्रीच्या अंधारात हल्ला केला. दहशतवाद्यांनी थेट घरात शिरून पोलीस अधिकारी आणि त्यांच्या पत्नी राजा बेगम यांच्यावर गोळ्यांचा वर्षाव केला. रात्री ११.०० वाजल्याच्या सुमारास पुलवामाच्या भागातील इरिपरिगाम भागात ही घटना घडली. या घटनेत फय्याज अहमद यांचा जागीच मृत्यू झाला. तर गंभीर झालेल्या त्यांच्या पत्नीला आणि अल्पवयीन मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु, उपचार सुरू असताना राजा बेगम यांचा मृत्यू झाला. तर गंभीर स्वरुपात जखमी झालेली मुलगी राफिया हिनेदेखील काही तासांतच अखेरचा श्वास घेतला. या घटनेनंतर सुरक्षा दलानं संपूर्ण परिसराला घेराव घातला आहे. तसंच दहशतवाद्यांना पकडण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलंय. याआधी रविवारी जम्मूतील हवाई दलाच्या तळावर रविवारी पहाटे दहशतवाद्यांकडून बॉम्ब हल्ला करण्यात आला होता. जम्मूत हवाई दलाच्या तळावर झालेला हल्ला हा ड्रोनने करण्यात आल्या असून हे ड्रोन पाकिस्तानातून आल्याचं गुप्तचर संस्थांनी सांगितलं आहे. देशात पहिलांदाच भारतीय सैन्याच्या ठिकाणांवर ड्रोनद्वारे हल्ला होण्याची ही पहिलीच घटना आहे.