
नवी दिल्ली : भारतात तब्बल ७३ दिवसांनंतर उपचार सुरू असणाऱ्या करोना संक्रमित रुग्णांची संख्या ८ लाखांहून खाली घसरलेली दिसतेय. एका दिवसातील जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, सध्या देशाचा ३.२४ टक्क्यांवर आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलीय. शुक्रवारी सकाळी आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार देशात गुरुवारी (१८ जून २०२१) ६२ हजार ४८० करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. दरम्यान, गेल्या २४ तासांत करोनामुळे १५८७ जणांचा मृत्यू नोंदविण्यात आला. गुरुवारी ८८ हजार ९७७ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आलीय. देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या २ कोटी ९७ लाख ६२ हजार ७९३ वर पोहचलीय. देशात आत्तापर्यंत २ कोटी ८५ लाख ८० हजार ६४७ रुग्ण करोनावर मात करण्यात यशस्वी ठरलेत. तर सध्या ७ लाख ९८ हजार ६५६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर देशातील मृतांची एकूण संख्या ३ लाख ८३ हजार ४९० वर पोहचलीय.
- एकूण करोना संक्रमित रुग्णांची संख्या : २ कोटी ९७ लाख ६२ हजार ७९३
- एकूण बरे झालेली रुग्णसंख्या : २ कोटी ८५ लाख ८० हजार ६४७
- उपचार सुरू : ७ लाख ९८ हजार ६५६
- : ३ लाख ८३ हजार ४९०
- करोना लसीचे डोस दिले गेले : २६ कोटी ८९ लाख ६० हजार ३९९