पेट्रोल-डिझेल विक्रमी पातळीवर ; जाणून घ्या आजचा तुमच्या शहरातील इंधन दर - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, July 11, 2021

पेट्रोल-डिझेल विक्रमी पातळीवर ; जाणून घ्या आजचा तुमच्या शहरातील इंधन दर

https://ift.tt/3i1rXpn
मुंबई : जागतिक कमॉडिटी बाजारात कच्च्या तेलाने ७५ डॉलरची पातळी ओलांडल्यानंतर पेट्रोलियम कंपन्यांचे धाबे दणाणले आहेत. कंपन्यांच्या आयात खर्चात वाढ झाली असून त्याचा भार ग्राहकांवर लादला जात आहे. मागील दोन महिन्यात देशभरात पेट्रोल आणि डिझेलमध्ये मोठी वाढ झाली आहे. देशातील चार प्रमुख महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेल दर सध्या विक्रमी पातळीवर आहे. आज रविवारी इंधन दर स्थिर आहेत. तर काल शनिवारी पेट्रोल ३५ पैसे आणि डिझेलमध्ये २६ पैशांची वाढ झाली होती. आज मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव १०६.९२ रुपये आहे. दिल्लीत पेट्रोल १००.९१ रुपये आहे. चेन्नईत पेट्रोलचा भाव १०१.६७ रुपये इतका आहे. तर कोलकात्यात एक लीटर पेट्रोल १०१.०१ रुपये झाले आहे. भोपाळमध्ये साध्या पेट्रोलचा भाव १०९.२४ रुपये इतका वाढला आहे. बंगळुरात पेट्रोल १०४.२९ रुपये झाले आहे. आज देशभरात डिझेल दर स्थिर आहेत. तत्पूर्वी कालच्या दरवाढीने मुंबईत डिझेलचा भाव ९७.४६ रुपये इतका झाला. दिल्लीत डिझेल ८९.८८ रुपये आहे. चेन्नईत ९४.३९ रुपये आणि कोलकात्यात डिझेलचा भाव ९२.९७ रुपये प्रती लीटर झाला आहे. भोपाळमध्ये डिझेलचा भाव ९८.६७ रुपये झाला आहे. बंगळुरात डिझेल ९५.२६ रुपये आहे. जागतिक कमॉडिटी बाजारात पुन्हा एकदा कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. शुक्रवारी आठवड्याच्या शेवटच्या आठवड्यात तेलाचा भाव १.४३ डॉलरने वधारला. ब्रेंट क्रूडचा भाव ७५.५५ डॉलर प्रती बॅरल झाला. डब्ल्यूटीआय क्रूडचा भाव १.६२ डॉलरने वधारून ७४.५६ डॉलर प्रती बॅरल झाला. भारतात तेल आयातीसाठी डॉलर्स खर्च करावे लागतात. इंधनाचे व्यवहार डॉलर्समध्ये होत असल्याने चलन विनिमय दर देखील महत्वाचा असतो.