अधिवेशनात सरकारला कोंडीत पकडणार; 'ही' असणार भाजपची रणनिती - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, July 1, 2021

अधिवेशनात सरकारला कोंडीत पकडणार; 'ही' असणार भाजपची रणनिती

https://ift.tt/3hrsAYG
अधिवेशनात करोना, शेतकरी, आरक्षणाच्या मुद्द्यांवर भाजपची रणनिती म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईः अधिक काळ चालले असते तर सर्वसामान्यांना न्याय देता आला असता. मात्र तसे झाले नसले तरी शेतकरी ते आरक्षण अशा सर्व प्रश्नांवर राज्य सरकारला कोंडीत पकडण्याची रणनिती तयार असल्याचे सांगत भाजपने बुधवारी राज्य सरकारला इशारा दिला. दोन दिवसांपेक्षा कमी काळ अधिवेशन ठेवता आले नसते म्हणूनच दोन दिवसांचे अधिवेशन ठेवण्यात आल्याची खोचक टीकाही भाजपने केली आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन दोन दिवसांचे निश्चित करण्यात आले आहे. मात्र, अधिवेशनाचा कालावधी वाढवण्यात यावा, अशी मागणी भाजपकडून करण्यात आली होती. पावसाळी अधिवेशन दोन दिवसांचेच करण्यावर राज्य सरकार ठाम आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी भारतीय जनता पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. बैठकीनंतर भाजपनेते आशीष शेलार म्हणाले की, करोना, शेतकरी आणि आरक्षण या मुद्द्यांवर आम्ही सरकारला धारेवर धरणार आहोत. तसेच नांदेड जिल्ह्यातील देगलूरमध्ये पोटनिवडणूक होणार आहे. या जागेवर विजय मिळवण्याची रणनीती आम्ही तयार केली आहे, असे सांगताना त्यांनी आधी निवडणूक घोषित करण्याची हिंमत तर दाखवावी, असेही शेलार म्हणाले. सरकारचे ढिसाळ नियोजन राज्यातील अनेक शहर आणि जिल्ह्यांत लशींच्या तुटवड्यामुळे लसीकरण ठप्प झाले आहे. जगभरातील लोक केंद्र सरकारकडून मार्गदर्शन घेत आहेत. मात्र, राज्य सरकारचे नियोजन ढिसाळ आहे, अशी टीकाही त्यांनी केली.