धक्कादायक: करपलेले पीक पाहून शेतकरी दाम्पत्याची आत्महत्या - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, July 10, 2021

धक्कादायक: करपलेले पीक पाहून शेतकरी दाम्पत्याची आत्महत्या

https://ift.tt/3hRfbtr
बुलडाणा: मृगातील पहिल्या पावसाच्या भरवशावर पेरणी केली. ती पेरणी वाया गेली. दुसऱ्यांदा शेत पेरले. पण, पावसाचा काही पत्ता नव्हता. डोळ्यांदेखत अंकुरलेले पीक करपत चालले होते. यामुळे हताश झालेल्या वृद्ध दाम्पत्याने ७ जुलैला विष प्राशन केले. दुसऱ्या दिवशी उपचारादरम्यान पत्नी दगावली, तर शुक्रवारी पतीचा मृत्यू झाला. ( ) वाचा: जिल्ह्यातील तालुक्यातील कारखेड येथे ही हृदयद्रावक घटना घडली आहे. (वय ६०) व (५१), अशी त्यांची नावे आहेत. गावातील स्मशानभूमीत एकच सरण रचून दोघांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या संपूर्ण प्रकाराने गावकऱ्यांना मोठा धक्का बसला असून गावावर शोककळा पसरली आहे. शेषराव मंजुळकार यांना दोन मुले आणि चार मुली असून सर्व जण विवाहित आहेत. शेतीसोबतच हे दाम्पत्य दगड फोडण्याचे आणि मजुरीचेही काम करायचे. पावसाने ओढ दिल्याने आणि दुबार पेरणीनंतरही हाती काहीच लागणार नसल्याचे दिसू लागल्याने कात्रीत सापडलेल्या दाम्पत्याने मृत्यूला कवटाळण्याचा टोकाचा निर्णय घेतला. वाचा: दरम्यान, विदर्भातील विविध भागांत गेले काही दिवस पावसाने ओढ दिली आहे. काही भागांत पाऊस परतला असला तरी मधल्या काळात शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. पेरणीनंतर अंकुरलेली पीके डोळ्यांदेखत करपत चालली आहेत. त्यामुळे बळीराजा विवंचनेत सापडला आहे. त्यात शेषराव मंजुळकार व जनाबाई मंजुळकार या दाम्पत्याने आत्महत्या केल्याने हे संकट अधिकच गडद झाले आहे. वाचा: