नेमबाजीत पदकांची झोळी रिकामी; मनू, राही सरनोबतकडून निराशा - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, July 30, 2021

नेमबाजीत पदकांची झोळी रिकामी; मनू, राही सरनोबतकडून निराशा

https://ift.tt/3j4EgSg
टोकियो: टोकियो ऑलिम्पिकमध्ये ज्या नेमबाजीतून सर्वाधिक पदक मिळण्याची आशा होती तेथे भारताला एकही पदक अद्याप मिळवता आले नाही. ऑलिम्पिक २०२० मध्ये भारताच्या पुरुष आणि महिला नेमबाजांना मोठे अपयश आले. आज झालेल्या महिलांच्या २५ मीटर पिस्तूल पात्रता फेरीत देखील भारताला मोठी निराशा हाती आली. वाचा- महिलांच्या २५ मीटर पिस्तूल पात्रता फेरीत भारताच्या आणि यांचा सहभाग होता. पात्रता फेरीत काल (२९ जुलै) झालेल्या प्रेसिशन राउंडमध्ये मनू भाकरने २९२ गुण मिळवत पाचवे स्थान तर राही सरनोबतने २८७ गुणासह १८वे स्थान मिळवले होते. अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी आजच्या रॅपिड राउंडमध्ये दोन्ही नेमबाजांना चांगली कामगिरी करण्याची गरज होती. वाचा- रॅपिड राउंडमध्ये राहीने ९६,९४,९६ असे २८६ गुण मिळले. प्रेशिसन आणि रॅपिडमध्ये मिळून तिचे ५७३ गुण झाले. अंतिम फेरीत पोहोचण्यास ती अपयशी ठरली. त्यानंतर भारताची आशा मनू भाकरवर होती. मनूने रॅपिड राउंडमध्ये ९६,९७,९७ असे २९० गुण मिळवले. तिचे एकूण गुण ५८२ झाले आणि मनू देखील अंतिम फेरीत पोहोचण्यास अपयशी ठरली. वाचा- नेमबाजीत आता महिलांच्या ५० मीटर रायफल थ्री पोजिशनमध्ये तेजस्विनी सावंत आणि अंजुम मुद्गील तर पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री पोजिशनमध्ये ऐश्वर्य प्रताम सिंह तोमर आणि संजीव राजपूत यांच्याकडून आशा असतील. महिलांच्या ५० मीटर रायफल थ्री पोजिशनची पात्रता फेरी उद्या (३१ जुलै) तर पुरुषांची पात्रता फेरी २ ऑगस्ट रोजी होणार आहे.