या पाॅलिसीत मिळतील २० मूलभूत संरक्षण;'एसबीआय जनरल इन्श्युरन्स'ची आरोग्य सुप्रीम - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, July 11, 2021

या पाॅलिसीत मिळतील २० मूलभूत संरक्षण;'एसबीआय जनरल इन्श्युरन्स'ची आरोग्य सुप्रीम

https://ift.tt/3e1UcCY
मुंबई : या भारतातील एका आघाडीच्या विमाकर्त्यांतर्फे ही सर्वसमावेशक आरोग्य विमा योजना आज सादर करण्यात आली. ग्राहकांना २० मूलभूत संरक्षण (बेसिक कव्हरेज) आणि ८ वैकल्पिक संरक्षण देणारे पूर्ण विमा संरक्षण मिळावे, याची खातरजमा करण्यासाठी ही विशिष्ट योजना रचण्यात आली आहे. या पॉलिसीअंतर्गत ५ कोटीपर्यंत विम्याचे विपुल पर्याय उपलब्ध आहेत, ज्यात कस्टमर्स विम्याची रक्कम आणि संरक्षण वैशिष्ट्यांच्या आधारे प्रो, प्लस आणि प्रीमियम या तीन पर्यायांमधून निवड करू शकतात. सम इन्श्युअर्ड रीफिल, रिकव्हरी बेनिफिट, कम्पॅशनेट व्हिजिट अशा ग्राहकस्नेही कव्हरेजेसपैकी (विमा संरक्षण) ग्राहक १ ते ३ वर्षांची पॉलिसीची मुदत निवडू शकतात. एसबीआय जनरल इन्श्युरन्स कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक पी. सी. कंदपाल म्हणाले, "आजच्या परिस्थितीत आरोग्य विमा हा पर्याय नसून गरज झाली आहे. 'आरोग्य सुप्रीम' या सर्वसमावेशक आरोग्य विमा योजनेमध्ये असलेले पुनःस्थापना वैशिष्ट्य आणि विमा पॉलिसीच्या रकमेचे अनेकविध पर्याय असल्यामुळे कस्टमर त्यांच्या सोयीनुसार प्रीमियम आणि मुदत यांची निवड करू शकतात." च्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्याने पुरेसा आरोग्य विमा घेऊन तुमच्या आर्थिक स्रोतांचे संरक्षण करण्याचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. या आजारात विविध प्रकारची आणि बदलत जाणारी लक्षणे दिसत असून हा आजार झालेल्या विविध प्रकारचे उपचार घ्यावे लागत आहेत. अशा परिस्थितीत, आरोग्य विमा संरक्षणाच्या रकमेचा पूर्ण वापर होण्याची शक्यता असल्याने आरोग्य सुप्रीम विमा पॉलसीमध्ये रीफिल फीचर समाविष्ट आहे. या फीचरमुळे कोणत्याही उपचारासाठी पॉलिसीची पूर्ण रक्कम संपली तर पॉलिसीधारक विमा संरक्षण असलेली पूर्ण रक्कम रीफिल करू शकतात. आरोग्य सुप्रीम हे सर्वसमावेशक उत्पादन आहे आणि रिटेल कस्टमरसाठी या योजनेत अनेक लाभ आणि कव्हरेज आहे, पण हे फाईल केलेले सर्व फीचर्स/कव्हरेजेस टप्प्या-टप्प्याने समाविष्ट करण्याचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले.