
मुंबई: कोकणातील चिपळून दौऱ्यावर असताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी यांच्याबाबत अपशब्द वापरल्यानंतर आता त्यांचे पुत्र यांनीही मुख्यमंत्र्यांवर बेधडक टिप्पणी केली आहे. राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री यांच्या वक्तव्यावर प्रत्युत्तर देताना राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर ही टिप्पणी केली आहे. (bjp criticizes while replying minister vijay wadettiwar) महापुरामुळे महाराष्ट्रात मोठे नुकसान झाले असून, केंद्र सरकारने अजूनही पॅकेज जाहीर केलेले नाही, अशी टीका मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारवर केली आहे. त्यावर प्रत्यु्तर देताना नितेश राणे यांनी टीकास्त्र सोडले आहे. क्लिक करा आणि वाचा- नितेश राणे म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना कोकणातील पूरस्थितीची पाहणी करण्याची परवानगी दिली. त्यानंतर नारायण राणे यांनी दौरा केला. राणे यांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे नारायण राणे यांनी तातडीची ७०० कोटींची मदत पाठवली आहे. आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७०० कोटी रुपये पाठवले, तरी तुमच्या मुख्यमंत्र्यांनी येऊन काय दिवे लावले हे वडेट्टीवार यांनी सांगावे. स्वतःचे ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याचे पाहायचे वाकून, असे करणे वडेट्टीवार यांनी सोडून द्यावे, असा खोचक टोलाही नितेश राणे यांनी वडेट्टीवारांना लगावलाय. क्लिक करा आणि वाचा- नितेश राणेंची उपमुख्यमंत्री अजित पवारांवरही टीका कोकणच्या दौऱ्यावर असताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत अपशब्द वापरल्याच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले. त्यावरून आमदार नितेश राणे यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली. कोणती भाषा वापरावी हे अजित पवार यांनी सांगणे म्हणजे राज कुंद्राने कुठला चित्रपट बघावा हे सांगण्यासारखे आहे. हे लक्षात घेता अजित पवार यांनी भाषेबाबत बोलू नये, असा टोला नितेश राणे यांनी लगावला. क्लिक करा आणि वाचा-