हाफिज सईदच्या घराबाहेर झालेल्या स्फोटात 'रॉ'चा सहभाग; पाकिस्तानचा आरोप - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, July 5, 2021

हाफिज सईदच्या घराबाहेर झालेल्या स्फोटात 'रॉ'चा सहभाग; पाकिस्तानचा आरोप

https://ift.tt/36fi3uw
इस्लामाबाद: काही दिवसांपूर्वी लाहोरमध्ये दहशतवादी हाफिज सईदच्या घराजवळ भीषण स्फोट झाला होता. या स्फोटामागे भारतीय गुप्तचर संस्था 'रॉ' चा सहभाग असल्याचा आरोप पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मोईद युसूफ यांनी केला आहे. सईदच्या घराबाहेर झालेल्या स्फोटामागे एका भारतीयाचा सहभाग असल्याचे त्यांनी सांगितले. लाहोरच्या जौहर टाउन परिसरात २३ जून रोजी झालेल्या या स्फोटात तीन ठार तर २४ जखमी झाले होते. या स्फोटाची जबाबदारी कोणत्याही दहशतवादी संघटनेने घेतली नाही. पंजाब पोलीस प्रमुख आणि माहिती व सूचना मंत्री फवाद चौधरी यांच्यासोबत पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मोईद युसूफ यांनी एका पत्रकार परिषदेत हा आरोप केला. हा स्फोट एका भारतीयाने केला असून गुप्तचर संस्थेसोबत त्याचा संपर्क असल्याचे त्यांनी म्हटले. वाचा: पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मोईद युसूफ यांनी म्हटले की, या दहशतवाद्यांकडून काही गोष्टी ताब्यात घेतल्या आहेत. फॉरेन्सिक विश्लेषण, इलेक्ट्रॉनिक उपकरणाच्या माध्यमातून आम्ही या हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि हा कट तडीस नेणाऱ्यांची ओळख पटवली आहे. या हल्ल्याचा मास्टरमांइड भारतीय गुप्तचर संस्था 'रॉ' चा एजंट असून तो सध्या भारतात असल्याचा दावा त्यांनी केला. पाकिस्तानने या हल्ल्याशी संबंधितांची ओळख अद्याप जाहीर केली नाही. वाचा: पुरावे असल्याचा दावा पत्रकार परिषदेत मोईद युसूफ यांनी तपास यंत्रणांकडे पुरावे असल्याचे सांगितले. आरोपींची खोटी नावे, खरी ओळख आणि संशयित ठिकाणांची माहिती हाती लागली आहे. वेगवेगळ्या तपास यंत्रणांच्या माध्यमातून ही माहिती, पुरावे जमा केले असल्याचा दावा त्यांनी केला.