एका दिवसातील करोनाबाधित रुग्णांची संख्या ३९ हजारांवर, ७२३ मृत्यू - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, July 5, 2021

एका दिवसातील करोनाबाधित रुग्णांची संख्या ३९ हजारांवर, ७२३ मृत्यू

https://ift.tt/3wru3Ed
नवी दिल्ली : आज (सोमवारी) सकाळी आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार देशात रविवारी (४ जुलै २०२१) ३९ हजार ७९६ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. याचसोबत देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या ३ कोटी ०५ लाख ८५ हजार २२९ वर पोहचलीय. दरम्यान, गेल्या २४ तासांत करोनामुळे ७२३ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. देशातील मृतांची एकूण संख्या ४ लाख ०२ हजार ७२८ वर पोहचलीय. रविवारी ४२ हजार ३५२ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आलीय. त्यामुळे करोनावर मात करणाऱ्या रुग्णांची एकूण संख्या २ कोटी ९७ लाख ०० हजार ४३० वर पोहचलीय. देशात सध्या ४ लाख ८२ हजार ०७१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
  • एकूण करोना संक्रमित रुग्णांची संख्या : ३ कोटी ०५ लाख ८५ हजार २२९
  • एकूण बरे झालेली रुग्णसंख्या : २ कोटी ९७ लाख ०० हजार ४३०
  • उपचार सुरू : ४ लाख ८२ हजार ०७१
  • : ४ लाख ०२ हजार ७२८
  • करोना लसीचे डोस दिले गेले : ३५ कोटी २८ लाख ९२ हजार ०४६
लसीकरण मोहीम देशात सुरु असलेल्या लसीकरण मोहिमेदरम्यान आतापर्यंत एकूण ३५ कोटी २८ लाख ९२ हजार ०४६ लसीचे डोस देण्यात आले आहेत. यातील १४ लाख ८१ हजार ५८३ लसीचे डोस रविवारी एकाच दिवसात देण्यात आलेत. भारतात पार पडलेल्या चाचण्या भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं (ICMR)दिलेल्या माहितीनुसार, ४ जुलै २०२१ पर्यंत देशात एकूण ४१ कोटी ९७ लाख ७७ हजार ४५७ नमुन्यांची चाचणी करण्यात आलीय. यातील १५ लाख २२ हजार ५०४ नमुन्यांची करोना चाचणी कालच्या एकाच दिवसात करण्यात आली.