वकील तरुणीवर अत्याचार; मुंबईतील दोन नामांकित वकिलांवर बलात्काराचा गुन्हा - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, July 27, 2021

वकील तरुणीवर अत्याचार; मुंबईतील दोन नामांकित वकिलांवर बलात्काराचा गुन्हा

https://ift.tt/372lghz
वकील तरुणीचा धमकाविल्याचाही आरोप म. टा. खास प्रतिनिधी, मुंबईः वकिली करणाऱ्या तरुणीच्या तक्रारीवरून मरीन ड्राइव्ह पोलिसांनी दोन वकिलांसह सात जणांविरोधात बलात्कार, विनयभंग, चोरी, मारहाण यांसह ठार मारण्याची धमकी अशा विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झालेले दोन्ही वकील प्रसिद्ध असल्याने एकाच खळबळ उडाली आहे. उच्च न्यायालयात प्रॅक्टिस करणाऱ्या दोन वकिलांच्या दक्षिण मुंबईतील कार्यालयात ३५ वर्षीय वकील तरुणी काम करीत होती. या कार्यालयात दोन्ही वकिलांनी वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप या तरुणीने केला आहे. त्यांना साथ देत नसल्याने या दोन्ही वकिलांनी त्यांच्या कार्यालयातील इतर पाच कर्मचाऱ्यांना हाताशी घेऊन आपला मानसिक छळ सुरू केल्याचे तिने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. या दोघांनी वारंवार केलेल्या अश्लील चाळ्यांची चित्रफीत तयार केली असून, कार्यालयात न आल्यास ती व्हायरल करण्याची धमकी दिली आहे. ही चित्रफीत व्हायरल करायची नसेल, तर ५० लाख रुपये दे, अशी धमकीही या दोघांनी दिली. ठार मारण्याची, चित्रफीत व्हायरल करण्याची आणि खंडणीची धमकी देऊन अनेकदा लैंगिक अत्याचार करण्यात आले. दुसऱ्या वकिलाने तर शरीरसुखाची मागणी केली. यामुळे प्रचंड मानसिक त्रास झाल्याने नोकरी सोडली. तरीही यांचा त्रास सुरूच असल्याने तक्रार करीत असल्याचे तिने म्हटले आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी दोन नामांकित वकील आणि त्यांच्या कार्यालयातील पाच कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणात अद्याप कुणालाही अटक करण्यात आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.