ट्रॅक्टर घेऊन संसदेवर धडकणाऱ्या राहुल गांधींची 'स्टंटबाजी'; कृषीमंत्री म्हणाले... - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, July 27, 2021

ट्रॅक्टर घेऊन संसदेवर धडकणाऱ्या राहुल गांधींची 'स्टंटबाजी'; कृषीमंत्री म्हणाले...

https://ift.tt/2UHBQkp
नवी दिल्लीः केंद्राच्या नवीन तीन कृषी कायद्यांवरून ( ) राजकारण तापलं आहे. कृषी कायद्यांविरोधात काँग्रेस नेते ( ) हे सोमवारी ट्रॅक्टरने संसदेकडे निघाले. पण नंतर त्यांचा ट्रॅक्टर पोलिसांनी जप्त केला. यावरून केंद्रीय कृषीमंत्री ( ) यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला. त्यांनी राहुल गांधींच्या बुद्धीवर सवाल उपस्थित केला. हे वागणं बदला. यामुळेच काँग्रेसमध्ये सर्वमान्य नेत्याचे स्थानही राहिले नाही, असं तोमर म्हणाले. राहुल गांधी हे स्वतः ट्रॅक्टर चालवत संसदेच्या दिशेने निघाले. यावरून राजकारण तापलं. राहुल गांधी हे ट्रॅक्टरने संसदेच्या गेटपर्यंत पोहोचले. त्यांच्यासोबत असलेल्या काँग्रेसच्या इतर नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. तसंच ज्या ट्रॅक्टरने ते संसदेच्या ठिकाणी आले तेही पोलिसांनी ताब्यात घेतलं. राहुल गांधींचीही स्टंटबीजी आहे. त्यांना गाव, गरीब, शेतकऱ्यांबद्दल कुठलाही अनुभव नाही आणि वेदनाही नाही. राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या निवडणूक जाहीरनाम्यात याच कायद्यांचा उल्लेख होता. मग राहुल गांधी त्यावेळी खोटं बोलत होते की ते आता खोटं बोलतायेत? असा सवाल नरेंद्र सिंह तोमर यांनी केला. राहुल गांधी शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत. अराजकतेचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याच्या याच चुकीच्या वागण्याने ते काँग्रेसमध्येही सर्ममान्य नेते राहिले नाहीत, असा टोला तोमर यांनी लगावला. आंदोलन करणाऱ्या संयुक्त किसान मोर्चाकडे कुठलाही प्रस्ताव नाहीए. यामुळेच ते चर्चेसाठी पुढे येत नाहीए. भारत सरकार शेतकरी संघटनांशी चर्चा करण्यास तयार आहे. कायद्यातील प्रत्येक तरतुदीवर बोलण्यास तयार आहोत, असं कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर म्हणाले. दरम्यान, ताब्यात घेण्यात आलेल्या काँग्रेस नेत्यांना नंतर पोलिसांनी सोडलं. यात काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार दीपेंद्र हुड्डा, प्रताप सिंह बाजवा आणि पक्षाच्या इतर खासदारांचा समावेश आहे.