नवी दिल्ली : आज (शनिवारी) सकाळी आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार देशात शुक्रवारी (९ जून २०२१) ४२ हजार ७६६ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. याचसोबत देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या ३ कोटी ०७ लाख ९५ हजार ७१६ वर पोहचलीय. देशात सध्या ४ लाख ५५ हजार ०३३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, गेल्या २४ तासांत करोनामुळे १२०६ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. देशातील मृतांची एकूण संख्या ४ लाख ०७ हजार १४५ वर पोहचलीय. शुक्रवारी ४५ हजार २५४ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आलीय. त्यामुळे करोनावर मात करणाऱ्या रुग्णांची एकूण संख्या २ कोटी ९९ लाख ३३ हजार ५३८ वर पोहचलीय.
- एकूण करोना संक्रमित रुग्णांची संख्या : ३ कोटी ०७ लाख ९५ हजार ७१६
- एकूण बरे झालेली रुग्णसंख्या : २ कोटी ९९ लाख ३३ हजार ५३८
- उपचार सुरू : ४ लाख ५५ हजार ०३३
- : ४ लाख ०७ हजार १४५
- करोना लसीचे डोस दिले गेले : ३७ कोटी २१ लाख ९६ हजार २६८