
पुणे: फायनान्स कंपनीची कर्जवसुली करणाऱ्यांनी एका व्यक्तीला खोलीत डांबून शारीरिक व मानसिक त्रास देत मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे संबंधित व्यक्तीची प्रकृती ढासळली आहे. याप्रकरणी ठाण्यात कर्ज वसूल करणाऱ्या एजन्सीच्या पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( ) वाचा: याबाबत येथील एका ५२ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. त्यानुसार ' 'चे चालक, मालक व तीन अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २६ जून रोजी दुपारी चार ते सायंकाळी सातच्या सुमारास नटराज हॉटेल शेजारी असलेल्या रिकव्हरी एजन्सीजच्या ऑफिसमध्ये ही घटना घडली आहे. वाचा: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांनी एका खासगी फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतले होते. आरोपी हे त्या फायनान्स कंपनीसाठी कर्जाची वसुली करून देण्याचे काम करतात. त्यातूनच त्यांनी तक्रारदार यांना त्यांच्या ऑफिसमध्ये नियमबाह्य पद्धतीने कर्जवसुली करण्यासाठी बोलवून घेतले. त्यानंतर जास्त रक्कम वसूल करण्यासाठी त्यांना शारीरिक व मानसिक त्रास देऊन बराच काळ डांबून ठेवले. हॉकी स्टीक व लोखंडी रॉडची धास्ती दाखवून पैसे दिले नाहीत तर त्यांना हातपाय तोडण्याची धमकी देण्यात आली. तक्रारदार हे ऑफिसमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना जिन्याजवळ धक्काबुक्की करत कानाखाली मारण्यात आले. त्यामुळे तक्रारदार यांची प्रकृती ढासळली. त्यांनी याबाबत पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली आहे. त्यानुसार रिकव्हरी एजन्सीच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक हे अधिक तपास करीत आहेत. वाचा: