अजबच! पाचवी इयत्तेवरील मुलांना मोफत निरोध देण्याचे आदेश - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, July 10, 2021

अजबच! पाचवी इयत्तेवरील मुलांना मोफत निरोध देण्याचे आदेश

https://ift.tt/3wq6jjG
वॉशिंग्टन: अमेरिकेतील शिकागो शहरातील शाळांसाठी देण्यात आलेल्या एका आदेशामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. नव्या शालेय धोरणानुसार शाळांना पाचवी व त्यावरील इयत्तेतील मुलांसाटी मोफत निरोधची व्यवस्था करण्यास सांगितले आहे. याचाच अर्थ शाळांना १० वर्षाच्या मुलांसाठी निरोधची व्यवस्था करण्यास सांगितले आहे. प्रशासनाच्या या आदेशानंतर सोशल मीडियावर लोकांनी संताप व्यक्त केला आहे. शिकागो पब्लिक स्कूल बोर्ड ऑफ एज्युकेशनच्या नव्या शालेय धोरणानुसार शाळांना पाचवी व त्यावरील इयत्तेत शिकणाऱ्या मुलांसाठी मोफत व्यवस्था करावी लागणार आहे. मुलांमध्ये लैंगिक आजार, एचआयव्ही संसर्ग आणि अनावश्यक गर्भधारण टाळता येतील असा तर्क शिक्षण मंडळाने दिला आहे. हे धोरण डिसेंबर २०२० मध्ये तयार करण्यात आले होते. मात्र, करोना महासाथीच्या आजारामुळे शाळा बंद असल्याने हा निर्णय अंमलात आणण्यात आला नाही. शिकागोमध्ये पुढील महिन्यापासून शाळा सुरू होणार आहेत. वाचा: अॅण्ड्र्यू पोलॉक या पालकाने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले की, शिकागो प्रशासन मोफत निरोधची व्यवस्था करण्यास सांगत आहे. मात्र, आपली मुले शाळांमध्ये गोळीबाराच्या भयाशिवाय मुक्तपणे शाळेत जाऊ शकतात का हे अधिक महत्त्वाचे असल्याचे त्यांनी म्हटले. अमेरिकेत अनेकदा गोळीबाराच्या घटना घडतात. शालेय विद्यार्थी, अल्पवयीन मुलांनाही लक्ष्य केले जाते. पोलॉक यांच्या ट्विटवर इतरांनी प्रतिक्रिया व्यक्त करत शिकागो शिक्षण मंडळाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली.