अमोल मिटकरी यांनी पुन्हा पडळकरांना डिवचलं; घणाघाती शब्दांत केली टीका - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, July 2, 2021

अमोल मिटकरी यांनी पुन्हा पडळकरांना डिवचलं; घणाघाती शब्दांत केली टीका

https://ift.tt/3xddOeS
अकोला : आमदार यांच्या समर्थकांनी काँग्रेसच्या सोलापुरातील कार्यालयावर दगडफेक केल्यानंतर आता राष्ट्रवादीनेही आक्रमक भूमिका घेतली आहे. राष्ट्रवादीचे आमदार यांनी पडळकर यांच्यावर विखारी टीका (NCP Hits Back To ) केली आहे. 'पडळकर यांच्या गाडीवर झालेली दगडफेक हा त्यांनीच घडवून आणलेला पब्लिसिटी स्टंट आहे. ही व्यक्ती अतिशय पिसाळलेली आहे आणि येणाऱ्या काळात भारतीय जनता पार्टीसाठी ही धोक्याची घंटा ठरणार आहे,' अशा शब्दांत अमोल मिटकरी यांनी गोपीचंद पडळकरांवर निशाणा साधला आहे. गोपीचंद पडळकर हे राज्यातील विविध शहरांमध्ये सध्या घोंगडी बैठका घेत आहेत. यावेळी सोलापूर शहरातील मड्डी वस्ती परिसरातील एसबीआय कॉलनी येथे ते बैठकीला आले असताना त्यांच्या गाडीवर एक दगड भिरकावण्यात आला. त्यात गाडीची समोरची काच फुटली. 'हा हल्ला राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांनीच केला असून प्रस्थापितांचा बहुजनांवर हल्ला आहे,' असं पडळकर या घटनेवर बोलताना म्हणाले होते. यावर आता राष्ट्रवादीकडून अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. 'तो व्यक्ती महापुरुषांबद्दल खासगीमध्ये एकेरी भाषेमध्ये बोलतो, तसंच मुंडे साहेबांच्या मृत्यूची बातमी कानावर आल्यानंतर दरेगावच्या शासकीय विश्रामगृहात आनंद व्यक्त करतो,' असा घणाघाती आरोपही मिटकरी यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर केला आहे. 'गोपीचंद पडळकर हे घेत असलेल्या घोंगडी बैठका अयशस्वी होत आहेत. त्यामुळे या बैठका पुन्हा चर्चेत याव्यात यासाठीच पडळकर स्टंटबाजी करत आहेत. राष्ट्रवादीच्या कार्यालयावर झालेल्या दगडफेकीला योग्य वेळी उत्तर देण्यात येईल,' असा इशाराही अमोल मिटकरी यांनी दिला आहे.