'ही घृणा हिंदुत्वाचं देणं', भागवतांच्या वक्तव्यावर ओवैसींचा पलटवार - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, July 5, 2021

'ही घृणा हिंदुत्वाचं देणं', भागवतांच्या वक्तव्यावर ओवैसींचा पलटवार

https://ift.tt/3xhEhYT
नवी दिल्ली : आगामी उत्तर प्रदेश निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशात पुन्हा एकदा राजकीय वर्तुळातून जाती-धर्मावरून भडक वक्तव्यांना सुरूवात झालेली दिसतेय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख यांनी केलेल्या हिंदुत्व आणि मॉब लिन्चिंगसंबंधी वक्तव्यानंतर पुन्हा एका नव्या चर्चेला सुरूवात झालीय. ''चे () प्रमुख यांनी मोहन भागवत यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिलीय. यावेळी, असदुद्दीन ओवैसी यांनी एकामागोमाग काही ट्विट केलंय. 'ही घृणा हिंदुत्वाचं देणं आहे, या गुन्हेगारांना हिंदुत्ववादी सरकारकडून छुपा पाठिंबा मिळालेला आहे' असं ट्विट असदुद्दीन ओवैसी यांनी केलंय. 'आरएसएसच्या भागवतांनी म्हटलं की लिन्चिंग करणारे हिंदुत्वविरोधी आहेत. या गुन्हेगारांना गाय आणि म्हशीत फरक माहीत नसेल परंतु, खून करण्यासाठी जुनैद, अखलाख, पहलू, रकबर,अलीमुद्दीन ही नावंच पुरेशी ठरतात. केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते अलीमुद्दीनच्या मारेकऱ्यांना पुष्पहार घालून सत्कार केला जातो. आसिफलात ठार मारणाऱ्यांच्या समर्थनार्थ महापंचायत बोलावली जाते. इथे भाजपचा एक प्रवक्त विचारतो 'आम्ही खूनही करू शकत नाही?' असं म्हणत असदुद्दीन ओवैसी यांनी संघाच्या अजेंड्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. 'भ्याडपणा, हिंसाचार आणि हत्या हा गोडसे हिंदुत्ववादी विचारसरणीचा अविभाज्य भाग आहे. मुसलमानांची लिन्चिंगदेखील याच विचारसरणीचा परिणाम आहे' असा घणाघातही ओवैसी यांनी केलाय. काय म्हणाले भागवत? ' एक आहेत. सर्व भारतीयांचा डीएनए एक आहे. एकही मुसलमान इथे राहू नये, असं कुणी हिंदू म्हणत असेल तर तो हिंदू नाही. गायीला हिंदू धर्मात पवित्र मानलं जातं. पण जे दुसऱ्यांना मारत आहेत ते हिंदुत्वाविरोधात आहेत. अशांवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जावी', अशी काही वक्तव्यं सरसंघचालक मोहन भागवत यांनी रविवारी गाझियाबादमध्ये केली होती. माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांचे सल्लागार डॉ. ख्वाजा इफ्तिकार अहमद यांनी लिहिलेल्या 'वैचारिक समन्वय-एक पहल' या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी भागवत बोलत होते.