रस्त्यांच्या कामासाठी हजारो कोटींचा खर्च; तरीही मुंबई खड्ड्यात - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, July 29, 2021

रस्त्यांच्या कामासाठी हजारो कोटींचा खर्च; तरीही मुंबई खड्ड्यात

https://ift.tt/3zNblZK
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई मुंबईत गेल्या २४ वर्षांत रस्तेकामांवर २१ हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. ही बाब भाजपने उघडकीस आणल्यानंतर या मुद्द्यावरून आणि भाजपमध्ये जोरदार जुंपली आहे. दोन्ही पक्षांनी एकमेकांवर आरोप सुरू केले आहेत. पालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या टोळीने मुंबई खड्ड्यात घातल्याचा आरोप भाजपचे आमदार अमित साटम यांनी केला आहे. तर पालिकेत गेली २० वर्षे सेनेबरोबर सत्ता उपभोगताना हा प्रश्न साटम यांना का पडला नाही, त्यांना आताच कसे स्वप्न पडले, असा सवाल शिवसेनेतर्फे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी केला आहे. साटम यांनी माहितीच्या अधिकारात मागील २४ वर्षांत रस्ते कामांवर २१ हजार कोटी रुपयांचा खर्च झाल्याची माहिती उघडकीस आणली आहे. रस्तेकामांवर केलेला हा कोट्यवधी रुपयांचा खर्च खड्ड्यात गेला असून करदात्यांच्या पैशांची लूट झाल्याचा आरोप करणारा व्हिडीओ साटम यांनी व्हायरल केला आहे. २१ हजार कोटी खड्ड्यात घालणारी पालिकेतील 'वाझे' टोळी कोण, मुंबईत रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते हा प्रश्न रोज निर्माण होतो, असे प्रश्न साटम यांनी उपस्थित केले आहेत. जाधव यांनी साटम हे आमदार असून त्यांनी राज्याच्या कामात लक्ष द्यावे, त्यांनी रस्तेकामांबाबत टीका करणे म्हणजे पालिकेतील भाजपचे नगरसेवक, गटनेते यांना अकार्यक्षम ठरविण्यासारखे आहे, अशा शब्दांत उत्तर दिले आहे. पालिकेत गेली अनेक वर्षे शिवसेना व भाजपची सत्ता असताना साटम हे नगरसेवक होते. त्यांनी त्यावेळी हे प्रश्न का उपस्थित केले नाहीत. इतकी वर्षे ते गप्प का बसले होते, अशा प्रश्नांची सरबत्ती करीत आमदार साटम यांनी आत्मपरीक्षण करावे,असा सल्लाही जाधव यांनी दिला आहे.