अमेरिकेची मोठी घोषणा; लसीकरणासाठी भारताला २.५ कोटी डॉलर्सची मदत - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, July 29, 2021

अमेरिकेची मोठी घोषणा; लसीकरणासाठी भारताला २.५ कोटी डॉलर्सची मदत

https://ift.tt/3f9vCk7
नवी दिल्लीः अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी बुधवारी पंतप्रधान मोदींची बुधवारी भेट ( calls on ) घेतली. भारत-अमेरिकेतील सामरिक भागिदारी अधिक बळकट करण्याच्या अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांच्या कटिबद्धतेचं पंतप्रधान मोदींनी स्वागत केलं. याआधी ब्लिंकन यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याशी द्वीपक्षीय मुद्द्यांवर चर्चा केली. भारत-अमेरिका द्वीपक्षीयसंबंधांपेक्षा मोजकेच संबंध अधिक महत्त्वाचे आहेत, असं ब्लिंकन म्हणाले. यासह अमेरिका भारताला करोनावरील लसीसाठी २.५ कोटी डॉलर्सची मदत करेल, अशी घोषणा त्यांनी केली. ब्लिंकन यांच्याशी झालेल्या भेटीनंतर पंतप्रधान मोदींनी ट्वीट केलं. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांच्या भेटीने आनंद झाला. भारत-अमेरिकेतील सामरिक भागिदारीच्या अध्यक्ष जो बायडन यांच्या कटिबद्धतेचे स्वागत करतो. ही भागिदारी आपल्या लोकशाही मुल्यांना आकार देत आहे आणि जगाच्या कल्याणासाठी एक बळही आहे, असं पंतप्रधान मोदी ट्वीटमध्ये म्हणाले. ब्लिंकन हे मंगळवारी संध्याकाळी भारतात दाखल झाले. ते इतर नेत्यांनाही भेटणार आहेत. भारत आणि अमेरिका हे व्यक्तीची प्रतिष्ठा, संधीची समानता, कायद्याचे शासन, धार्मिक स्वातंत्र्यासह या मूलभूत स्वातंत्र्यावर विश्वास ठेवतात, असं ब्लिंकन हे पंतप्रधान मोदींच्या भेटीपूर्वी एका कार्यक्रमात म्हणाले होते. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्यासोबत ब्लिंकन यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. करोनावरील लसीसाठी अमेरिका भारताला २.५ कोटी डॉलरची मदत करेल, अशी घोषणा ब्लिंकन यांनी केली. अमेरिकेने भारताला २ कोटी डॉलरहून अधिक रकमेची करोनासंबंधी मदत दिली आहे. तसंच आपल्याला सांगताना आनंदो होतीय की, भारताच्या लसीकरणाच्या प्रयत्नांना साथ देण्यासाठी अमेरिका भारताला आणखी २.५ कोटी डॉलरची मदत देईल, असं ब्लिंकन म्हणाले. अमेरिका आणि भारत करोना महामारी संपवण्यासाठी कटिबद्ध आहेत. आम्ही मिळून काम करू, असं ब्लिंकन यांनी स्पष्ट केलं. एस. जयशंकर आणि अँटनी ब्लिंक यांच्यात विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. अफगाणिस्तानमधील स्थिती, हिंद आणि प्रशांत महासागरातील भागिदारी, करोन महामारीचा सामना करण्यासाठीचे प्रयत्न आणि प्रदेशिक सुरक्षा बळकट करण्याच्या मुद्द्यांवर व्यापक चर्चा झाली. भारत आणि अमेरिकेची पावलं २१ वे शतक आणि त्यानंतरच्या काळाचे स्वरुप निश्चित करतील. यामुळेच भारतासोबत बळकट भागिदारी करणं हे अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणात अव्वल स्थानी आहे, असं ब्लिंकन यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. अफगाणिस्तामधील संघर्षावर सैन्य कारवाई हा तोडगा नाहीए. शांततेच्या मार्गातून समाधानकारक तोडगा काढता येऊ शकतो. यामुळे तालिबान आणि अफगाणिस्तान सरकारने चर्चा करायला हवी. भारताने अफगाणिस्तानच्या विकासात महत्त्वाचे योगदान दिले आहे आणि पुढेही देत राहील, असं असं ब्लिंकन म्हणाले.