अतिशय वाईट! 'या'मुळे १३४ क्विंटल धान्य जेसीबीच्या सहाय्याने पुरावे लागले - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, July 29, 2021

अतिशय वाईट! 'या'मुळे १३४ क्विंटल धान्य जेसीबीच्या सहाय्याने पुरावे लागले

https://ift.tt/3f5OuAE
म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर पन्हाळा तालुक्यातील बाजार भोगाव या गावात रेशन दुकानदाराच्या हलगर्जीपणामुळे तब्बल १३४ क्विंटल रेशनचे . त्यामुळे हे धान्य खड्डा खोदून जेसीबीच्या सहाय्याने पुरावे लागल्याची घटना बुधवारी घडली. दरम्यान, याबाबत पंचनामा करण्यात आला असून संबंधित दुकानदाराकडून याची किंमत वसूल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (due to the negligence of the ration shopkeeper ) याबाबत अधिक माहिती अशी , बाजार भोगाव येथे शेतकरी संघाचे रेशन दुकान आहे. महापुराच्या काळात येथील धान्य दुकानदाराने सुरक्षित ठिकाणी ठेवले नाही. त्यामुळे चार दिवस धान्य पुरात अडकल्यामुळे खराब झाले. हे खराब धान्य माणसांना अथवा पशुपक्ष्यांनाही खाण्यालायक नसल्यामुळे बुधवारी एका शेतात खड्डा खोदून ते पुरण्यात आले. यामध्ये ८१ क्विंटल गहू, ४३ क्विंटल तांदूळ आणि साखरेचा समावेश होता. क्लिक करा आणि वाचा- पन्हाळा तहसीलदारांनी सकाळी या धान्याचा पंचनामा केला. त्यानंतर धान्य पुरण्यात आले. संबंधित दुकानदाराकडून या धान्याची किंमत म्हणून चार लाख रुपये वसूल करण्याचे आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रेय कवितके यांनी दिले आहेत. कवितके यांनी सांगितले की, सदर धान्य माणसांना अथवा पशुपक्ष्यांनाही खाण्यास योग्य नसल्यानेच जमिनीत पुरण्याची परवानगी देण्यात आली. याबाबत सरकारला माहिती देण्यात आली आहे. क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-