प्रशांत किशोर यांची I-PAC टीम पोलिसांच्या 'नजरकैदेत'; TMC चा हल्लाबोल... - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, July 27, 2021

प्रशांत किशोर यांची I-PAC टीम पोलिसांच्या 'नजरकैदेत'; TMC चा हल्लाबोल...

https://ift.tt/3zF7TQA
अगरतळाः अगरतळामध्ये गेल्या आठवड्याभरापासून एका हॉटेलमध्ये तळ ठोकून असलेल्या निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या इंडियन पॉलिटिकल अॅक्शन कमिटीच्या ( ) टीमची स्थानिक पोलिसांनी चौकशी केली. राज्यातील राजकीय स्थिती आणि तृणमूल काँग्रेससाठी संभाव्य समर्थनाचा अभ्यास करत आहे. पोलिसांच्या कारवाईवरून त्रिपुरातील तृणमूल काँग्रेसच्या शाखने हा लोकशाहीवरील हल्ला असल्याचं म्हटलं आहे. पोलिसांनी त्यांना हॉटेलमध्ये बंद केलं आहे, असा आरोप टीएमसीने केला आहे. अगरतळातील हॉटेलमध्ये असलेल्या आय-पॅक टीममधील २३ सदस्यांची चौकशी केली जात आहे. हे एक नियमित चौकशी आहे, असं पश्चिम त्रिपुराचे पोलिस अधीक्षक माणिक दास यांनी सांगितलं. करोनाचे निर्बंध असतानाही बाहेर फिरत होतेः पोलिस करोना संसर्ग रोखण्यासाठी निर्बंध लागू आहेत. तरीही जवळपास २३ जण विविध ठिकाणी फिरत होते. यामुळे आम्ही त्यांचं शहरात येण्याची आणि थांबण्याच्या कारणांची माहिती घेण्यासाठी चौकशी केली. यासर्वांची करोना चाचणी करण्यात आली. त्यांच्या रिपोर्टची आता प्रतीक्षा आहे, असं माणिक दास म्हणाले. पोलिसांची ही कारवाई लोकशाहीवर हल्ला करणारी आहे, असं त्रिपुरातील तृणमूल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आशीष लाल सिंह यांनी म्हटलंय. हा लोकशाहीवर हल्ला आहे. त्रिपुराचा निवासी असल्याने या प्रकराने आपण स्तब्ध झालो आहोत. ही त्रिपुराची संस्कृती नाही. त्रिपुरातील भाजप नेतृत्वातील सरकार कुशासनामुळे टीएमसी मिळत असलेल्या मोठ्या समर्थनामुळे घाबरले आहे, अशी टीका त्यांनी केली. घटनेची माहिती नाहीः भाजप या घटनेची माहिती तृणमूलच्या प्रमुख ममता बॅनर्जी आणि निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांना देण्यात आली आहे, असं सूत्रांनी सांगितलं. तर आपल्याला या घटनेची कुठलीही माहिती नाही, असं त्रिपुरा भाजपचे प्रदेशाध्यक्ष माणिक साहा यांनी सांगितलं.