Live Update: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कोल्हापूर दौरा - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, July 27, 2021

Live Update: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कोल्हापूर दौरा

https://ift.tt/3zBvaD2
मुंबईः कोकणवासी पूर ओसरल्यानंतर सावरत असतानाच, पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मात्र अजून पूरस्थिती कायम आहे. जिल्ह्यातील शिरोळी गावात अजूनही एनडीआरएफचे बचावकार्य सुरू आहे. (Maharashtra Flood) राज्यातील काही जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यानं पूरस्थिती निर्माण झाली आहे. आता पुराचे पाणी ओसरले असली तरी पूरग्रस्तांच्या पुर्नवसनाचा प्रश्न कायम आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पूरग्रस्तांची भेट घेतली आहे. तसंच, अन्य नेत्यांनीही पूरग्रस्त भागात भेट दिली आहे. Live Update
  • नितीन राऊत आज महाड, नागोठणे व पेण दौऱ्यावर; विद्युतविभागाच्या झालेल्या नुकसानग्रस्त भागाचा आढावा घेणार
  • सांगलीला दिलासा; कृष्णेची पातळी ५ फुटाने ओसरली
  • राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आज चिपळूण, तळीये दौऱ्यावर
  • शिरोळ गावातील पूरग्रस्तांची भेट घेऊन साधला संवाद
  • उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कोल्हापूर दौरा
  • कोल्हापूरात पावसाची उसंत; नद्यांच्या पाणीपातळीत घट