Tokyo Olympic 2020: नेमबाजीत पुन्हा एकदा निराशा; मनू भाकेर आणि यशस्विनी देस्वाल अपयशी - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, July 25, 2021

Tokyo Olympic 2020: नेमबाजीत पुन्हा एकदा निराशा; मनू भाकेर आणि यशस्विनी देस्वाल अपयशी

https://ift.tt/3eO5qLR
टोकियो: ऑलिम्पिक २०२०च्या दुसऱ्या दिवशी भारतासाठी निराश करणारी बातमी आली आहे. टोकियो ऑलिम्पिकच्या दुसऱ्या दिवशी महिला १० मीटर एअर पिस्तूल पात्रता फेरीत भारताच्या दोन्ही खेळाडूंना अपयश आले. काल पुरुषांच्या नेमबाजीत आलेल्या अपयशा पाठोपाठ आज महिलांकडून देखील निराशा झाली. वाचा- महिला १० मीटर एअर पिस्तूल पात्रता फेरीत भारताच्या आणि या दोन महिला नेमबाज होत्या. या दोन्ही नेमबाजांना टॉम ८ खेळाडूंमध्ये स्थान मिळवता आले नाही. मनूने ५७५ गुणांसह १२वे तर यशस्विनीने ५७४ गुणांसह १३वे स्थान मिळवले. पात्रता फेरी सुरू असताना मनू भाकेरच्या पिस्तूलमध्ये काही तांत्रिक बिघाड झाला होता. त्यामुळे तिला थोडा वेळ ब्रेक घ्यावा लागला. वाचा- मनू भाकेरचा स्कोअरबोर्ड यशस्विनी देस्वालचा स्कोअरबोर्ड वाचा- काल (शनिवारी) पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्तूरमध्ये भारताचे अभिषेक वर्मा आणि सौरभ चौधरी हे दोन नेमबाज होते. अभिषेकला अंतिम फेरी गाठता आली नाही. पण सौरभ अव्वल स्थानासह अंतिम फेरीत पोहोचला. पण तेथे त्याला सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले. सौरभकडून यावेळी पदकाची आशा होती. पाहा काय म्हणाली हिना सिद्धू