
मुंबई : कच्च्या तेलाचा भाव पुन्हा एकदा ७० डॉलर प्रती बॅरलवर गेला आहे. यामुळे भारतासाठी कच्च्या तेलाची आयात खर्चिक होणार आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी मात्र आज सलग २६ व्या दिवशी इंधन दर स्थिर ठेवले आहेत. आज पेट्रोल आणि डिझेल दरात कोणताही बदल झाला नाही. आज गुरुवारी मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव १०७.८३ रुपये आहे. आज दिल्लीत पेट्रोल १०१.८४ रुपये आहे. चेन्नईत पेट्रोलचा भाव १०२.४९ रुपये इतका आहे. तर कोलकात्यात एक लीटर पेट्रोल १०२.०८ रुपये झाले आहे. भोपाळमध्ये साध्या पेट्रोलचा भाव ११०.२० रुपयांवर कायम आहे. बंगळुरात पेट्रोल १०५.२५ रुपये झाले आहे. मुंबईत आजचा ९७.४५ रुपयांवर कायम आहे. दिल्लीत डिझेल ८९.८७ रुपये आहे. चेन्नईत ९३.६३ रुपये आणि कोलकात्यात डिझेलचा भाव ९३.०२ रुपये प्रती लीटर झाला आहे. भोपाळमध्ये डिझेलचा भाव ९८.६७ रुपये झाला आहे. बंगळुरात डिझेल ९५.२६ रुपये आहे. जागतिक कमॉडिटी बाजारात सलग दोन सत्रात कच्च्या तेलाच्या किमतीत तेजी दिसून आली आहे. डब्ल्यूटीआय क्रूडचा भाव ०.९६ डॉलरने वधारून ६९.२५ डॉलर प्रती बॅरल झाला. तसेच ब्रेंट क्रूडचा भाव ०.८१ डॉलरने वधारून ७१.४४ डॉलर प्रती बॅरल झाला.