
नवी दिल्ली : अफगाणिस्तानात तालिबाननं एक-एक करून आतापर्यंत अनेक भागांवर आपला ताबा मिळवला आहे. खुद्द अफगाणिस्तानचे राष्ट्रपती यांना आपला देश सोडावा लागला आहे. अशावेळी या अशांत वातावरणात भारत, अमेरिका यांच्यासहीत जगातील अनेक देशांचे नागरिक अडकून पडलेत. याच पार्श्वभूमीवर भारतातील दूतावासात काम करणारे कर्मचाऱ्यांसहीत अफगाणिस्तानात राहणाऱ्या १२९ भारतीय आणि इतर प्रवाशांना घेऊन ''चं एक विशेष विमान भारतात दाखल झालंय. अफगाणिस्तानातून परतलेल्यांच्या म्हणण्यानुसार, तालिबान्यांच्या वर्चस्वानंतर इथली परिस्थिती आणखीनच खराब झालीय. कट्टरतावादी आणखी भागांवर कब्जा मिळवत असताना वातावरण बिघडून शकतं, याचा अंदाज अनेकांना आलाय. इथे असलेल्या अनेकांना आपल्या आणि आपल्या कुटुंबीयांची सुरक्षेची चिंता सतावतेय. याच कारणामुळे भारतानंच नाही तर देशातील अनेक देशांनी अफगाणिस्तानातील आपले दूतावास बंद करून आपल्या कर्मचाऱ्यांना आपापल्या देशात परत बोलावून घेतलंय. उल्लेखनीय म्हणजे, काबूलला ताब्यात घेण्यासाठी तालिबानला जवळपास दोन महिन्यांचा कालावधी लागू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात असतानात केवळ २४ तासांत तालिबान्यांनी ताब्यात आपल्या ताब्यात घेतलंय. ते देखील एकही गोळी न झाडता.... यावरून तालिबानची ताकद आणि धास्ती सहजच लक्षात येऊ शकेल. अफगाणिस्तानात तालिबानच्या या वर्चस्वामुळे अलकायदा, जैश ए मोहम्मद, लष्कर ए तोयबा तसंच आयसिस यांसारख्या दहशतवादी संघटनांना पुन्हा एकदा बळ मिळण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.