रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला बेड्या; बनावट रेल्वे नियुक्तीपत्र दिले अन्... - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, August 26, 2021

रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला बेड्या; बनावट रेल्वे नियुक्तीपत्र दिले अन्...

https://ift.tt/3mzTDVW
मटा मागोवा बनावट नियुक्तीपत्र प्रकरण म. टा. प्रतिनिधी, मुंबईः रेल्वेत नोकरी देण्याचे आमिष दाखवत दोन युवा खेळांडूंची बनावट रेल्वे नियुक्तीपत्र देऊन फसवणूक करणाऱ्या वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. अजय आपटे असे या अधिकाऱ्याचे नाव असून तो पश्चिम रेल्वेत वरिष्ठ क्रिडा अधिकारी या पदावर कार्यरत आहे. या अटकेच्या वृत्ताला पश्चिम रेल्वे आणि रेल्वे पोलिस यांनी दुजोरा दिला आहे. खेळातील दर्जेदार सुविधा लक्षात घेता नवोदित खेळाडूंचे रेल्वेत नोकरीला लागून देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न असते. खेळाडूंच्या या स्वप्नांचा फायदा घेत दोन कबड्डीपटूंना 'कमर्शियल कम तिकीट क्लार्क' या पदाचे बनावट नियुक्तीपत्र देऊन त्यांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार जुलै महिन्यात उघडकीस आला होता. याप्रकरणी सर्वात आधी 'मटा'ने वृत्त दिले होते. या प्रकरणी तपास करत असताना मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिसांनी मंगळवारी रेल्वे अधिकारी अजय आपटेला अटक केली. या प्रकरणातील आणखी चार आरोपींचा शोध सुरू आहे. यामुळे अटकेबाबत रेल्वे पोलिसांनी अधिक माहिती देण्यास असमर्थता व्यक्त केली. खेळाडूंच्या फसवणूकप्रकरणी रेल्वे अधिकाऱ्यांचा समावेश असल्याच्या संशयामुळे पश्चिम रेल्वेने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली समिती नियुक्त केली होती. लवकरच या समितीचा अहवालही येणार आहे. त्यानंतर संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांवर कोणत्या प्रकारची कारवाई करण्यात येईल, हे सांगणे योग्य ठरेल, असे पश्चिम रेल्वे अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले.