क्रिप्टो करन्सीजमध्ये तेजी; जाणून घ्या कोणत्या डिजिटल चलनांच्या किमतीत झाली वाढ - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, August 26, 2021

क्रिप्टो करन्सीजमध्ये तेजी; जाणून घ्या कोणत्या डिजिटल चलनांच्या किमतीत झाली वाढ

https://ift.tt/3mDiiJl
मुंबई : बिटकॉइनपाठोपाठ इतर प्रमुख क्रिप्टो करन्सीजच्या किमतीतील तेजी कायम आहे. आज गुरुवारी बिटकॉइन, Binance Coin, सोलाना या क्रिप्टो करन्सीजच्या किमती वाढल्या आहेत. आज गुरुवारी बिटकॉइनच्या किमतीत १.२२ टक्के वाढ झाली आणि त्याचा भाव ४८८३७.२४ डॉलरपर्यंत वाढला. मागील काही आठवडे बिटकॉइनचा भाव ३०००० ते ४०००० डॉलरच्या दरम्यान होता. तर एप्रिल महिन्यात बिटकॉइनने ६५००० डॉलरचा विक्रमी पल्ला गाठला होता. याआधी गेल्या आठवड्यात बिटकॉइनच्या किमतीत पडझड दिसून आली. तर सोमवारी त्यांनी पुन्हा एकदा ५०००० डॉलर्सचा टप्पा ओलांडला. कॉइनडेक्सनुसार आज गुरुवारी इथेरियमच्या किमतीत ०.५३ टक्क्याची वाढ झाली आहे. एका इथेरियमचा भाव ३२२१.०३ डॉलर इतका वाढला. डोजेकॉइनचा भाव ०.२९ डॉलर असून त्यात ०.८१ टक्के घट झाली आहे. आज Binance Coin च्या किमतीत ६.६० टक्के वाढ झाली असून तो आता ५०० डॉलर्सवर गेला आहे. एका Binance Coin चा भाव ५१०.२३ डॉलर झाला आहे. सोलाना या क्रिप्टो करन्सीच्या किमतीत २.२९ टक्के वाढ झाली असून तो ७२.९७ डॉलर झाला आहे. एका XRP चा भाव १.१७ डॉलर इतका आहे. पोलकॅडोटच्या दरात आज ०.३५ टक्के वाढ झाली आहे. एका कॉइनचा भाव २५.८८ डॉलर इतका आहे. तसेच तिथेरचा भाव १ डॉलर झाला आहे. आज कार्डानोचा भाव २.७३ डॉलर इतका वाढला असून त्यात०.८४ टक्के घसरण झाली आहे. जागतिक क्रिप्टो करन्सीजची उलाढाल २.०९ लाख कोटी डॉलर्स इतकी झाली आहे. त्यात बुधवारच्या तुलनेत १.०९ टक्के घसरण झाली. यात बिटकॉइनचा जवळपास ४३ टक्के वाटा आहे.