पुण्यात गॅरेजमध्ये आग लागून अनेक गाड्यांचे नुकसान; २ जण जखमी - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, August 8, 2021

पुण्यात गॅरेजमध्ये आग लागून अनेक गाड्यांचे नुकसान; २ जण जखमी

https://ift.tt/37r2DE9
पुणे: शहरातील उत्तमनगर येथील कोपरे गाव येथे एका मोठ्या गॅरेजमधे आग ( News) लागून गाड्यांचे नुकसान झालं आहे. तसंच या आगीच्या घटनेत दोघे जखमी झाले असून त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कोपरे गाव इथं बस आणि इतर गाड्यांची दुरुस्ती करणारे मोठे गॅरेज आहे. या गॅरेजला रात्री उशिरा अचानक आग लागली. या आगीची माहिती मिळाल्यानंतर व पीएमआरडीए अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि काही वेळानंतर आगीवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र या दुर्घटनेत ३ बस जळून खाक झाल्याची माहिती आहे. दरम्यान, ही आग कशामुळे लागली, याबाबतची नेमकी माहिती अद्याप मिळू शकली नाही.