दापोली: जिल्ह्यात शहरात केळसकर नाक्याजवळ दाभोळ रोडवर तब्बल दोन किलो गांजा पकडण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी दोन संशयित आरोपीना ताब्यात घेण्यात आले आहे. ११ ऑगस्ट रोजी बुधवारी सायंकाळी उशीरा ही करवाई करण्यात आली आहे. याप्रकरणात मकसूद जाफर पावसकर रा.कोकंबाआळी दापोली, साहिल अब्बास पठाण रा.मच्छीमामार्केट दापोली या दोन संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. एक चारचाकी वाहनही जप्त करण्यात आले आहे. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती. स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या अंमलीपदार्थ विरोधी पथकाने ही मोठी कारवाई केली आहे. या कारवाईमुळे दापोली शहरात होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. यापूर्वीही दापोली शहरात कोकंबाआळी येथे गांजविरोधात मोठी कारवाई केली होती. त्यावेळी याच परिसरातून एका महिलेला पोलिसांनी अटक केली होती. याप्रकरणाच्या पुढील तपासात अजून कोणते मोहरे गळाला लागतात? नेमका सूत्रधार कोण? याची माहिती तपाासात पुढे येण्याची शक्यता आहे. या प्रकरणाची फिर्याद शांताराम रामचंद्र झोरे, वय ४६ वर्षे, पोहेका / स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, रत्नागिरी यांनी दिली आहे. दापोली तालुका पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या उपस्थितीत ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रत्नागिरीकडुन करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक कार्यालय रत्नागिरी येथून चिपळुण, खेड पेट्रोलींग करीत दापोली येथे आले होते. यावरुन त्यांना मिळालेल्या गुप्त माहीती वरून या पथकाने ही मोठी कारवाई केली आहे.
https://ift.tt/3CFWJNL