
मुंबई : बॉलिवूडची ड्रामा क्विन अर्थात सतत वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते. राखीवर तिचे चाहतेदेखील भरभरून प्रेम करतात. इतकेच नाही तर राखीदेखील तिच्या चाहत्यांशी सोशल मीडियावरून अनेकदा संवाद साधत असते. त्यामुळेच राखीने सोशल मीडियावर फोटो किंवा व्हिडिओ अपलोड केले की लगेचच ते व्हायरल होतात आणि त्यावर चर्चा होतात. आताही राखी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. याला कारण ठरलं तिच्या घरात जबरदस्तीने घुसू पाहणारा चाहता. काय झाले नेमके विरल भयानीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत राखी म्हणते की, 'एक अनोळखी व्यक्ती माझ्या घरात दरवाजा तोडून शिरण्याचा प्रयत्न करत होती. त्यावेळी घरात कुणीच नव्हते. घरामध्ये एक मुलगी होती तिने त्याला अडवण्याचा प्रयत्न केला पण त्यात ती जखमी झाली. या अज्ञात व्यक्तीच्या विरोधात ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ही अज्ञात व्यक्ती स्वतःला माझा चाहता असल्याचे वारंवार सांगत होती. पोलिसांनी या अज्ञात व्यक्तीला अटक केली असून त्याला तुरुंगात ठेवले आहे.' दरम्यान, राखी सलमान खान सूत्रसंचालन करत असलेल्या 'बिग बॉस १४' मध्ये सहभागी झाली होती. तेव्हापासून ती सातत्याने चर्चेत असते. राखी सध्या तिच्या अनेक प्रोजेक्टमध्ये व्यग्र आहे. तिचे 'लॉकडाऊन' हे गाणे अलिकडेच रिलीज झाले आहे. त्याआधी 'ड्रीम में एंट्री' हे गाणे रिलीज झाले होते. ही दोन्ही गाणी तिच्या चाहत्यांनी खूपच आवडली आहेत.