
मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांनी आज सोमवारी इंधन दरात कोणताही बदल केला नाही. सलग २९ व्या दिवशी कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेल दर जैसे थे ठेवले आहेत. यापूर्वी १७ जुलै २०२१ रोजी पेट्रोल दरात ३० पैसे वाढ झाली होती तर डिझेलमध्ये १५ जुलै २०२१ रोजी १५ पैशांची वाढ करण्यात आली होती कच्च्या तेलाचा भाव ६८ डॉलर प्रती बॅरल इतका खाली आला असल तरी पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेल दरात कोणताही बदल केलेले नाही. कंपन्यांनी आज सलग २९ व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेल दर जैसे थेच ठेवले आहेत. आज सोमवारी मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव १०७.८३ रुपये आहे. आज दिल्लीत पेट्रोल १०१.८४ रुपये आहे. चेन्नईत पेट्रोलचा भाव ९९.४७ रुपये इतका आहे. शुक्रवारी तामिळनाडू राज्य सरकारने पेट्रोलवरील शुल्क ३ रुपयांनी कमी केले होते. त्यामुळे आजच्या घडीला चेन्नईत सर्वात कमी दरात पेट्रोल मिळत आहे. कोलकात्यात एक लीटर पेट्रोल १०२.०८ रुपये झाले आहे. भोपाळमध्ये साध्या पेट्रोलचा भाव ११०.२० रुपयांवर कायम आहे. बंगळुरात पेट्रोल १०५.२५ रुपये झाले आहे. मुंबईत आजचा ९७.४५ रुपयांवर कायम आहे. दिल्लीत डिझेल ८९.८७ रुपये आहे. चेन्नईत ९३.६३ रुपये आणि कोलकात्यात डिझेलचा भाव ९३.०२ रुपये प्रती लीटर झाला आहे. भोपाळमध्ये डिझेलचा भाव ९८.६७ रुपये झाला आहे. बंगळुरात डिझेल ९५.२६ रुपये आहे.