मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत अपमानजनक वक्तव्य केल्यानंतर केंद्रीय मंत्री यांना रत्नागिरीतील संगमेश्वर येथे अटक करण्यात आली. दरम्यानच्या काळात शिवसेनेचे खासदार यांनी यांना पत्र लिहून नारायण राणे यांचा नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा घ्यावा अशी मागणी केली होती. त्यावर केंद्रातून आपल्याला फोन आल्याचे सांगत आपल्या मागणीची तत्काळ दखल घेतली गेल्याचे विनायक राऊत यांनी म्हटले आहे. (mp gets reply from pmo regarding demand of resignation of union minister ) आपल्या मागणीबाबत बोलताना खासदार राऊत म्हणाले की, नारायण राणे हे केंद्रीय मंत्री आहेत. केंद्रीय मंत्रिपदावर असलेल्या मंत्र्याचे वर्तन मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निदर्शनास आणून दिले. या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अवघ्या दहा मिनिटात त्या पत्राची दखल घेतली याचा मला अभिमान वाटतो. दुपारी त्यांच्या कार्यालयातून मला फोन आला. पंतप्रधान बैठकीत व्यस्त असल्याने तुम्ही गृहमंत्री अमित शाह यांच्याशी बोला. तुमचे तक्रार पत्र मी अमित शाह यांच्याकडे पाठवले आहे, असे मला सांगण्यात आले. आता नारायण राणे यांनी जनाची नाही, तरी मनाची लाज बाळगावी आणि ताबडतोब केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, असे आवाहनही खासदार राऊत यांनी नारायण राणे यांना केले आहे. क्लिक करा आणि वाचा- केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यासाठी पोलिसांवर दबाव होता या विरोधकाचा आरोप विनायक राऊत यांनी फेटाळून लावला. राणे यांना अटक करण्यासाठी पोलिसांवर कोणाचाही दबाव नव्हता असे ते म्हणाले. पोलिस हे कायद्याचे रक्षणकर्ते आहेत आणि त्याप्रमाणे त्यांनी कायद्याचे रक्षण केलेले आहे. या अटकेमुळे राज्यातील वातावरण चिघळण्याची शक्यता नसल्याचे राऊत म्हणाले. क्लिक करा आणि वाचा- करावे तसे भरावे असे सांगतानाच वातावरण चिघळण्याची सुरुवातच नारायण राणे यांनी केली. यामुळे त्यांना अटक करण्याची आवश्यकता होती. वातावरण चिघळलं तर ती जबाबदारी भाजपाची असेल, असे राऊत म्हणाले. राणेंच्या वक्तव्याचं समर्थन न करण्याबाबत मी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करीन असेही राऊत म्हणाले. क्लिक करा आणि वाचा-