पराभवाचा दुष्काळ संपवत मुंबई इंडियन्सने मारली बाजी, पंजाबवर साकारला धडाकेबाज विजय - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, September 29, 2021

पराभवाचा दुष्काळ संपवत मुंबई इंडियन्सने मारली बाजी, पंजाबवर साकारला धडाकेबाज विजय

https://ift.tt/2WpPsBG
आबुधाबी : कायरल पोलार्डच्या धडाकेबाज अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर आज अखेर मुंबई इंडियन्सने पराभवाचा दुष्काळ संपवल्याचे पाहायला मिळाले. पंजाबने प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सपुढे १३६ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईने सहा विकेट्स राखून विजय साकारला. मुंबईला विजयासाठई १३६ धावांचे माफक आव्हान मिळाले असले तरी त्यांना सुरुवातीलाच रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांच्यारुपात दोन मोठे धक्के बसले होते. त्यानंतर क्विंटन डीकॉकने काही काळ चांगली फलंदाजी केली, पण त्याला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. पण त्यानंतर सौरभ तिवारीने दमदार फलंदाजी करत संघाचा धावफलक हलता ठेवण्याची जबाबदारी चोख बजावली होती. पण अर्धशतकाला पाच धावा हव्या असताना तिवारी बाद झाला, तिवारीने यावेळी ३७ चेंडूंत तीन षटकार आणि दोन चौकारांच्या जोरावर ४५ धावांची खेळी साकारली. पंजाबच्या संघाला यावेळी प्रथम फलंदाजी करताना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. पंजाबच्या संघाने सावध सुरुवात केली असली तर कृणाल पंड्याने यावेळी मुंबईला पहिले यश मिळवून दिले. कृणालने यावेळी मनदीप सिंगला बाद केले, त्याला १५ धावा करता आल्या. मनदीप बाद झाल्यावर ख्रिस गेल आणि लोकेश राहुल ही भन्नाट जोडी मैदानात होती, पण त्यावेळी कायन पोलार्ड मुंबईच्या मदतीसाठी धावून आला. पोलार्डने पहिल्यांदाच गेलला बाद केले, त्याला फक्त एकच धाव करता आली. गेलनंतर राहुललाही पोलार्डने बाद केले आणि पंजाबला मोठा धक्का दिला. राहुलला यावेळी २१ धावा करता आल्या. ख्रिस गेल आणि राहुलसारखे महत्वाचे फलंदाज बाद झाल्यानंतरही पंजाबला धावफलक हलता राहीला. कारण यावेळी एडन मार्करमने दमदार फलंदाजी करत पंजाबसाठी चांगल्या धावा जमवल्या. पण मुंबई इंडियन्सचा फिरकीपटू राहुल चहरने त्याला बाद केले आणि मुंबईला मोठे यश मिळवून दिले. मार्करमने यावेळी २९ चेंडूंत सहा चौकारांच्या जोरावर ४१ धावांची दमदार खेळी साकारली. त्यामुळे पंजाबला मुंबईपुढे १३६ धावांचे आव्हान ठेवता आहे. पण ट्वेन्टी-२० क्रिकेटचा विचार करता हे आव्हान मोठे वाटत नव्हते.