
नवी दिल्लीः कन्हया कुमार यांनी भारतीय कम्युनिस्ट पार्टी (CPI) सोडून मंगळवारी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावर सीपीआयचे सरचिटणीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जेएनयूचे माजी विद्यार्थी नेते कन्हया कुमार यांनी स्वतः सीपीआय सोडली आणि त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. कन्हया कुमार भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (CPI) नेतृत्वाशी प्रामाणिक नव्हते आणि त्यांनी पक्षाकडे आपल्या मागण्या स्पष्टही केल्या नाहीत, असा आरोप डी. राजा यांनी केला. हे स्वतः पक्षातून बाहेर पडले. कन्हय्या कुमार पक्षाशी प्रामाणिक नव्हते. कन्हया कुमार पक्षात येण्याच्या पूर्वीपासून भाकपा (CPI) होती आणि त्यांच्या गेल्यानंतरही राहील, असं म्हणत डी राजा यांनी कन्हया कुमारच्या कम्युनिस्ट विचारधारेवरील विश्वासावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. भाकपा जातीहिन, वर्गहिन समाजासाठी लढत आहे. पण कन्हय्या कुमारच्या काही वैयक्तिक महत्वाकांक्षा आणि आकांक्षा असाव्यात. म्हणजेच कम्युनिस्ट आणि कामगार वर्गाच्या विचारधारेवर कन्हय्या कुमारचा विश्वास नसल्याचं यावरून दिसून येतंय, अशी जोरदार टीका डी. राजा यांनी केली. कन्हय्या कुमार यांनी मंगळवारी दिल्लीत राहुल गांधींच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. जेएनयूमधील विद्यार्थी नेता असलेले कन्हय्या कुमार यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाकपमध्ये प्रवेश केला. त्यांनी बिहारमधील बेगूसराय इथून भाजपच्या गिरीराज सिंहांविरोधात निवडणूक लढवली. पण त्यांचा पराभव झाला.