
म. टा. प्रतिनिधी, विविध प्रकारचे खाद्य पदार्थ शिकणे, हस्तकला, पेटिंग्सचे व्हिडीओ बघून घरीच त्याचे अनुकरण करणे, यासाठी यू-ट्युबचा वापर करण्यात येतो. मात्र एका तरुणीने प्रियकराच्या सल्ल्यावरून चक्क यू-ट्युबवरील व्हिडीओ बघून केल्याची धक्कादायक घटना यशोधरानगर भागात उघडकीस आली आहे. याप्रकरणी यशोधरानगर पोलिसांनी अत्याचार व बळजबरीने गर्भपात करण्यास बाध्य करण्याचा गुन्हा दाखल करून युवकाला अटक केली आहे. सोहेल खान (वय २४ रा. गरीब नवाजनगर) असे अटकेतील युवकाचे नाव आहे. या अजब प्रकाराने पोलिसही चक्रावले आहेत. पाच वर्षांपूर्वी सोहेल याने पीडित २४ वर्षीय तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकविले. लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला. दरम्यान, तरुणी गर्भवती राहिली. तरुणीने डागा हॉस्पिटलमध्ये नोंदणी केली. सोहेल हा पती असल्याची नोंदही तिने हॉस्पिटलमध्ये केली. ती नियमितपणे हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी जायला लागली. १० ऑगस्टला तरुणीचे नातेवाइक बाहेरगावी गेले. यादरम्यान तरुणी खाली पडली. गर्भातील अर्भकाचा मृत्यू झाल्याचे तिच्या लक्षात आले. तरुणीने सोहेल याच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधून याबाबत माहिती दिली. बघून गर्भपात करण्याचा सल्ला सोहेल याने तरुणीला दिला. तरुणीने यू- ट्युबवरील व्हिडीओ बघून अर्भक बाहेर काढले. कात्रीने अर्भकाची नाळ कापली. काही वेळाने सोहेल हा तिच्या घरी आला. त्याने अर्भकाला स्मशानघाटात पुरले. या घटनेनंतर सोहेल याने तरुणीसोबत लग्न करण्यास नकार दिला. दरम्यान, तरुणीचे नातेवाइक परतले. त्यांना डागा हॉस्पिटलचे दस्तऐवज आढळले. त्यांनी तरुणीला विचारणा केली. तरुणीने घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर नातेवाइकासह यशोधरानगर पोलिस स्टेशन गाठून तरुणीने तक्रार दिली. पोलिसांनी अत्याचारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून सोहेल याला अटक केली. सोहेल याने पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला असून, त्याने अन्य एका युवतीशी दुसरे लग्न केल्याची माहिती आहे.