दाक्षिणात्य अभिनेता साई धरम तेजच्या स्पोर्ट्स बाईकचा अपघात - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, September 11, 2021

दाक्षिणात्य अभिनेता साई धरम तेजच्या स्पोर्ट्स बाईकचा अपघात

https://ift.tt/3hnSeP4
मुंबई: दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील अभिनेता या अपघात झाल्याचं समोर आलं आहे. अभिनेता त्याच्या दुचाकीवरून शुक्रवारी रात्री दुर्गमचेरुवु केबल पुलावरून जात असताना हा अपघात झाला आहे. साई धरम तेज त्याची स्पोर्ट बाईक चालवत होता. रस्त्यावर चिखल असल्यानं त्याची बाईक घसरली आणि हा अपघात झाल्याचं म्हटलं जात आहे. साई धरम तेज यानं हेल्मेट घातल्यानं त्याला मोठी ईजा झाली नाही. अपघातानंतर त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. साई धरम तेज याच्या टीमकडून दिलेल्या माहितीनुसार ' साई धरम तेजची तब्येत स्थिर आहे. चिंता करण्याचं कोणतंही कारण नाहीए. रुग्णालयात त्याची काळजी घेतली जात आहे. अपघातानंतर सोशल मीडियावर काही फोटो व्हायरल झाले आहेत. त्या फोटोंमध्ये साई धरम तेजच्या डोळ्याला आणि कमरेवरती जखमा झाल्याचं पाहायला मिळत आहे.