काँग्रेस सोडताना भाजपने पैशांची ऑफर दिली होती, श्रीमंत पाटलांचा दावा - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, September 13, 2021

काँग्रेस सोडताना भाजपने पैशांची ऑफर दिली होती, श्रीमंत पाटलांचा दावा

https://ift.tt/3hr7pac
अथनीः कर्नाटक विधानसभेच्या अधिवेशनाच्या तोंडावर भाजपचे माजी मंत्री आणि कागवडचे आमदार ( ) यांच्या वक्तव्याने भाजपची गोची झाली आहे. २०१९ मध्ये काँग्रेस सोडण्यासाठी भाजपने आपल्या पैशांची ऑफर दिली होती, असा दावा श्रीमंत पाटील यांनी केला. भाजपने किती ऑफर दिली होती? असा प्रश्न श्रीमंत पाटील यांना केला गेला. आपल्याला पैसे नको तर चांगले पद हवे, असं आपण भाजपला सांगितलं. तुम्ही किती पैसे हवेत, असं भाजपने आपल्याला विचारलं होतं. पण आपल्याला पैसे नकोत तर जनतेची सेवा करण्यासाठी सरकारमध्ये चांगलं पद द्या असं आपण भाजपला सांगितलं होतं, असा दावा पाटील यांनी केला. कागवड तालुक्यातील ऐनापूर गावात विकासकामांचं उद्घाटन करताना ते बोलत होते. येडिरप्पा यांच्या मंत्रिमंडळा श्रीमंत पाटील हे मंत्री होते. पण बसवराज बोम्मई हे मुख्यमंत्री झाल्यानंतर पाटील यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर मला आपल्या मतदारसंघाचा विकास करायचा होता आणि यामुळेच आपण पदाची मागणी केली होती. त्यावेळी भाजप नेत्यांनी मान्य केलं आणि आपल्याला मंत्रीपद दिलं. पण यावेळी आपल्याला मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं नाही. पण पुढच्या मंत्रिमंडळ विस्तारात आपल्याला स्थान दिलं जाईल, असं आश्वासन भाजप नेत्यांनी दिल्याचं श्रीमंत पाटील म्हणाले. श्रीमंत पाटील यांनी हे वक्तव्य करून मंत्रीपद मिळवण्यासाठी भाजपवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला आहे. तसंच श्रीमंत पाटील यांच्या वक्तव्यामुळे विरोधी पक्षांना भाजप सरकारवर निशाणा साधण्याची संधी मिळणार आहे. भाजप आमदारांचा घोडेबाजार करत असल्याचा आरोप आता विरोधक करतील, असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे. श्रीमंत पाटील यांचा साखर कारखाना आहे. १९९९ मध्ये एस. एम. कृष्ण सरकार आल्यावर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. यानंतर २००४ मध्ये काँग्रेसने उमेदवारी नाकारल्यावर त्यांनी धर्मनिरपेक्ष जनता दलात प्रवेश केला होता. पण त्यानंतर त्यांचा दोनवेळा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला होता. रमेश जारकीहोली यांच्यासोबत श्रीमंत पाटील यांनी २०१८ च्या निवडणुकीवेळी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली आणि ते निवडणूक जिंकले. पण २०१९ मध्ये रमेश जारकीहोली आणि इतर काही आमदारांसह त्यांनी पुन्हा काँग्रेस सोडली. यानंतर त्यांनी २०२१ मध्ये झालेल्या कागवड मतदारसंघाच्या पोटनिवडणूक श्रीमंत पाटील यांनी जिंकली.