
मुंबई : मनी हाइस्ट ( 5) नेटफ्लिक्सवर रिलीज होताच पाचवा सीझनला भारतात प्रचंड पसंती मिळाली आहे. या सिरिजचे फक्त लोकंच नाही तर मुंबई पोलिसही दिवाने झाले आहेत. मुंबई पोलिसही या मालिकेच्या प्रेमात पडले आहेत. कारण मुंबई पोलिसांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून 'बेला चाओ' या गाण्यावर एक परफॉर्मन्स सादर केला आहे. ज्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. मुंबई पोलिसांचा हा व्हिडिओ लोकांना खूप आवडला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. नेटफ्लिक्सवर रिलीज होताच मनी हाइस्ट चर्चेचा विषय ठरला. जगाव्यतिरिक्त, या मालिकेला भारतातही खूप लोकप्रियता मिळाली. आधी पहा हा व्हिडिओ या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की अनेक मुंबई पोलीस कर्मचारी 'बेला चाओ' (Bella Ciao) या गाण्याचे सूर वाजवत आहेत. बेला चाओ हे एक इटालियन शेतकरी निषेध गीत आहे. जे लोकांना खूप आवडतं. मुंबई पोलिसांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर याची तालीम सुरू असतानाचा करणारा खाकी बँडचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्याने यासोबत कॅप्शनही लिहिले आहे की, "ट्रेंड आणि नवीन काहीही मिस न करण्याचा नेहमीच प्रयत्न करा. नेटफ्लिक्स इंडियाने मुंबई पोलिसांच्या पोस्टवर टिप्पणी देखील केली आहे. १५ हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे आणि शेकडो लोकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. या व्हिडीओवर एका युजरने लिहले की, मुंबई पोलिसात अनेक प्रतिभावान लोक आहेत. त्याचवेळी, दुसऱ्या वापरकर्त्याने असे म्हटले आहे की - खाकी नेहमी जिंकते.