या अभिनेत्रीनं बायोपिक करावा, अशी जयललितांची होती इच्छा - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, September 12, 2021

या अभिनेत्रीनं बायोपिक करावा, अशी जयललितांची होती इच्छा

https://ift.tt/3Ahm92A
मुंबई: तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री दिवंगत जयललिता यांच्या जीवनावर आधारित असलेल्या '' हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. या सिनेमामध्ये जयललिता यांची भूमिका अभिनेत्री कंगना रणौतने साकारली आहे. या सिनेमाचे स्पेशल स्क्रिनिंग नुकतेच करण्यात आले. त्यावेळी बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. हा सिनेमा पाहिल्यानंतर यांनी सांगितले की, आपल्या बायोपिकमध्ये बॉलिवूडमधील एका आघाडीच्या अभिनेत्रीने काम करावे अशी इच्छा जयललिता यांची इच्छा होती. काय म्हणाल्या सिमी गरेवालमुंबईत 'थलायवी' सिनेमाचा खास शो झाला. सिनेमा पाहायला हिंदी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार हजर होते. हा सिनेमा पाहिल्यानंतर सिमी गरेवाल यांनी सोशल मीडियावर या सिनेमाचे भरभरून कौतुक केले. त्याचबरोबर एक मोठा खुलासादेखील केला. त्यांनी लिहिले की, 'मी कंगनाच्या कोणत्याच वक्तव्याला पाठिंबा देत नाही. पण मी तिच्या अभिनय कौशल्याची मात्र प्रशंसा नक्की करेन. थलायवी चित्रपटासाठी तिने प्रचंड मेहनत घेतली आहे. पण जयललिता यांची इच्छा होती की अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनने त्यांची भूमिका साकारावी.' कंगनाचं होतय कौतुक सिमी गरेवाल यांच्याबरोबरच अनेकांनी कंगनाच्या अभिनयाचे भरभरून कौतुक केले आहे. कंगनाने १६ वर्षांच्या बालिकेपासून ते मध्यमवयीन जयललिता यांची भूमिका साकारण्यासाठी तिने खूप परिश्रम घेतले आहे. दरम्यान, ‘थलायवी’ सिनेमा हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे.