अमेरिकन ओपन: गेल्या ५३ वर्षात असे घडले नाही, एम्मा रादुकानूला विजेतेपद - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, September 12, 2021

अमेरिकन ओपन: गेल्या ५३ वर्षात असे घडले नाही, एम्मा रादुकानूला विजेतेपद

https://ift.tt/3lh7235
न्यूयॉर्क: ब्रिटनच्या १८ वर्षीय एम्मा रादुकानूने अमेरिकन ओपनच्या महिला एकेरीचे विजेतेपद जिंकून इतिहास घडवला. गेल्या ५३ वर्षात अमेरिकन ओपनचे विजेतेपद मिळवणारी ती पहिली ब्रिटिश महिला ठरली आहे. एम्मा रादुकानूने कॅनडाच्या लीलाह फर्नांडिजचा ६-४, ६-३ असा पराभव करून या प्रतिष्ठेच्या ग्राँड स्लॅड स्पर्धेचे विजेतेपद मिळवले. या दोन्हीही खेळाडू प्रथमच अंतिम फेरीत पोहोचल्या होत्या. अखेर एम्माने बाजी मारली. वाचा- एम्मा रादुकानूच्या विजयानंतर अमेरिकन ओपनच्या अधिकृत ट्विटवरून ट्विट करण्यात आले की, ५३ वर्षाची प्रतिक्षा संपली १९६८ सालानंतर अमेरिकन ओपनच्या महिला एकेरीचे विजेतेपद मिळवणारी ती पहिली ब्रिटिश महिला आहे. रादुकानूने अमेरिकन ओपन स्पर्धेत आतापर्यंत एकही सेट गमावलेला नाही. तिने १८ सेट जिंकले आहेत. यातील ३ क्वालिफाईंग दौऱ्यातील तर ६ सामने मेन ड्रॉ मधील होते. १९९९ नंतर ही पहिलीच वेळ आहे की अमेरिकन ओपनच्या फायनलमध्ये दोन युवा महिला खेलाडू खेळत होत्या. १९९९ साली १७ वर्षीय सेरेना विलियम्स आणि १८ वर्षीय मार्टिना हिंगिस या भिडल्या होत्या. १९७७ साली विंबल्डन स्पर्धेत वर्जीनिया वेडने ग्रँड स्लॅम स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. त्यानंतर ग्रॅड स्लॅम जिंकणारी ती पहिली ब्रिटश महिला आहे. २००४ साली मारिया शारापोव्हाने विंबल्डन स्पर्धेचे विजेतेपद १७व्या वर्षी जिंकले होते. त्यानंतर महिलांमध्ये सर्वात कमी वयात विजेतेपद मिळवणारी रादुकानू पहिली महिला ठरील आहे.