PM मोदी लाँच करणार नवी वाहिनी, काँग्रेस नेत्याचा धर्मासंबंधित कार्यक्रम, सूत्रांची माहिती - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, September 11, 2021

PM मोदी लाँच करणार नवी वाहिनी, काँग्रेस नेत्याचा धर्मासंबंधित कार्यक्रम, सूत्रांची माहिती

https://ift.tt/3nnsPJg
नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी १५ सप्टेंबरला नवीन वाहिनी लाँच करणार ( to launch on september 15 ) आहेत. लोकसभा टीव्ही आणि राज्यसभा टीव्ही मिळून बनवण्यात आलेली संसद टीव्ही या वाहिनीचे लाँचींग पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते कर्ण सिंह, अर्थतज्ज्ञ बिबेक देब्रोय, नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत आणि वकील हेमंत बत्रा हे या नवीन वाहिनीवर स्वतंत्र कार्यक्रमांचे संचालन करतील, असं सूत्रांनी सांगितलं. संसद टीव्ही ही एक माहितीपूर्ण वाहिनी असेल. या वाहिनीद्वारे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांसाठी लोकशाही मूल्ये आणि देशातील संस्थांशी संबंधित विषयांवर उच्च दर्जाची माहिती सादर करेल, असं सूत्रांनी सांगितलं. संसदेचं अधिवेशन सुरू झाल्यावर संसद टीव्हीवर लोकसभा आणि राज्यसभेच्या कामकाजाचे थेट प्रसारण केले जाईल. संसद टीव्ही ही वाहिनी पंतप्रधान मोदी, उपराष्ट्रपती एम. व्यकय्या नायडू आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या उपस्थितीत औपरिकरित्या लाँच केली जाईल. काँग्रेस नेते कर्ण सिंह आणणार धर्मावर आधारीत कार्यक्रम काँग्रेस नेते कर्ण सिंह हे विविध धर्मांबाबत तर बिबेक देब्रोय हे इतिहास आणि अमिताभ कांत हे भारतातील सुधारणांवरील कार्यक्रमाचे संचालन करतील. हेमंत बत्रा कायद्यांशी संबंधित विषयांवर कार्यक्रमाचे संचालन करतील. अर्थमंत्रालयाचे प्रमुख सल्लागार संजीव सान्याल अर्थव्यवस्थेवर आणि शल्य चिकीत्सक अंबरीश मिथायी हे आरोग्यसंबंधीच्या विषयांवरील कार्यक्रमाचे संचालन करतील. भारतीय प्रशासकीय सेवेतील निवृत्त अधिकारी आणि वस्त्रोद्योग मंत्रालयाचे माजी सचिव रवी कपूर हे संसद टीव्हीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. तर लोकसभा सचिवालयातील संयुक्त सचिव मनोज अरोरा हे विशेष कार्यकारी अधिकारी (ओएसडी) आहेत.