महापालिकेसमोरच मनसेची खड्डेविक्री; शिवसेनेला केलं लक्ष्य - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, October 16, 2021

महापालिकेसमोरच मनसेची खड्डेविक्री; शिवसेनेला केलं लक्ष्य

https://ift.tt/3j79t8h
‌म. टा. खास प्रतिनिधी, मुंबईतील रस्त्यांवरील वाढत्या खड्ड्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुन्हा एकदा सत्ताधारी शिवसेनेवर टीकेची झोड उठविली आहे. याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने थेट मुंबई महापालिकेसमोरच खड्डे विक्री करीत प्रतिकात्मकरित्या आंदोलन केले. ५० टक्के सवलतीत हे खड्डे विक्रीस काढण्यात आले होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे योगेश चिले यांच्या नेतृत्वाखाली मुंबई महापालिकेच्या इमारतीसमोरील सेल्फी पाइंट येथे हे आंदोलन करण्यात आले होते. दसऱ्याच्या निमित्ताने अनेक जण वेगवेगळ्या वस्तू विकत असतात. त्याचप्रकारे आम्हीदेखील मुंबईतील खड्डे विक्रीस काढले असल्याचे योगेश चिले यांनी यावेळी सांगितले. मुंबईकर कोट्यवधी रुपयांचा कर भरतात. मात्र, त्यानंतरही त्यांच्या नशिबी चांगले रस्ते येत नसल्याने आम्ही हे आंदोलन करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मनसेतर्फे वरळी विधानसभेतील खड्डे, तसेच महापौर किशोरी पेडणेकर यांच्या विभागातील खड्डे ५० टक्के सवलतींमध्ये विक्रीस ठेवण्यात आले होते.