पंजाब काँग्रेसमधील पेच सुटला? सिद्धूंची वरिष्ठ नेत्यांसोबत झाली बैठक - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, October 15, 2021

पंजाब काँग्रेसमधील पेच सुटला? सिद्धूंची वरिष्ठ नेत्यांसोबत झाली बैठक

https://ift.tt/3aCrcPY
नवी दिल्लीः पंजाब काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर नवज्योत सिंग सिद्धू ( ) आज प्रथमच दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात पोहोचले. सिद्धू यांनी पक्षाचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल आणि पंजाब प्रभारी हरीश रावत यांची भेट घेतली. मात्र, सिद्धू या पदावर कायम राहणार की नाही? याबाबत कुठलीही स्पष्टता करण्यात आलेली नाही. पंजाब काँग्रेसबाबत ज्या काही समस्या होत्या त्या हायकमांडला कळवल्या आहेत. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधींवर माझा पूर्ण विश्वास आहे. ते जो काही निर्णय घेतील, तो काँग्रेस आणि पंजाबच्या हिताचे असेल. त्यांना सर्वोच्च मानतो आणि त्यांच्या प्रत्येक आदेशाचे पालन करेन, असं बैठकीनंतर नवज्योत सिंग सिद्धू म्हणाले. राजीनाम्याबाबत रावत यांचे स्पष्टीकरण सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी जे काही आदेश देतील, ते तो पाळतील. काँग्रेसला बळ द्यावे, संघटना मजबूत करावी आणि त्यासाठी पूर्ण ताकदीने काम करावे, असा अगदी स्पष्ट आदेश आहे. प्रत्येक गोष्टीची एक प्रक्रिया असते. उद्यापर्यंत थांबा. उद्या परिस्थिती अधिक स्पष्ट होईल. सिद्धूंवर काँग्रेसला बळकटी देण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे, असं हरीश रावत यांनी स्पष्ट केलं. २८ सप्टेंबरला सिद्धू यांनी पंजाब काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना त्यांनी पत्र लिहिलं होतं.