'आमच्या नेत्यांच्या चौकशा लावल्या म्हणूनच भाजपची साथ सोडली' - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, October 24, 2021

'आमच्या नेत्यांच्या चौकशा लावल्या म्हणूनच भाजपची साथ सोडली'

https://ift.tt/3C4YT94
जळगाव: प्रक्रिया पारदर्शकपणे सुरू आहे. त्यात कुठलाही सत्तेचा दुरुपयोग झाला नाही. उमेदवारांचे अर्ज बदलण्याचे भाजपाने केलेले आरोप बिनबुडाचे आहेत, त्यांच्या अनुभवी उमेदवारांना देखील उमेदवारी अर्ज व्यवस्थित भरता आले नसल्याची टीका राष्ट्रवादीचे माजी मंत्री व डॉ. सतीष पाटील यांनी एका पत्रकार परिषदेत केली. त्यांच्या उमेदवारांना लढण्याची इच्छा नसल्यानेच जाणिवपूर्वक अर्ज चुकविल्याचा आरोपही डॉ. पाटील यांनी यावेळी लगावला. ( ) वाचा: जळगाव जिल्हा बँक निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक प्रक्रियेबाबत भाजपने केलेल्या आरोपांना उत्तर देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रविंद्र पाटील, गुलाबराव देवकर, डॉ. सतीष पाटील, बँकेच्या चेअरमन अ‍ॅड. रोहिणी खडसे, आमदार अनिल भाईदास पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी गुलाबराव देवकर यांनी सांगितले की, जिल्हा बँक निवडणूक प्रक्रियेत कुठल्याही प्रकाराचा सत्तेचा दुरुपयोग झालेला नाही. संपूर्ण प्रकियेचे सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या साह्याने चित्रीकरण झाले आहे. तसेच भाजपाने केलेले अर्ज बदलविण्याचा आरोप केविलवाण आहे. खासदार रक्षा खडसे व माजी आमदार स्मिता वाघ हे अनुभवी उमेदवार असून देखील त्यांचे अर्ज चूकलेच कसे? त्यांना अर्ज का भरता आले नाहीत? असे प्रश्न उपस्थित करीत त्यांनीच जाणिवपूर्वक अर्ज चुकविल्याचा आरोप यावेळी माजी मंत्री डॉ. सतीष पाटील यांनी केला. तसेच यांच्याविरोधात रक्षा खडसे यांचा अर्ज भरून भाजपने आमच्या घरांमध्ये भांडणे लावण्याचे काम केल्याचेही सतीष पाटील यांनी सांगितले. मागील पाच वर्षांत जिल्हा बँकेत सर्वपक्षीय पॅनल होते. या काळात बँक व शेतकरी हीताचे काम झाले आहे. बँकेत आलेल्या तपासयंत्रणांनी देखील या कामाचे कौतुक केल्याची माहीती गुलाबराव देवकर यांनी यावेळी दिली. वाचा: ...म्हणून सर्वपक्षीय पॅनलमधून बाहेर पडलो सर्वपक्षीय पॅनलसाठी आमचीही तयारी होती. मात्र, या दरम्यान भाजप नेत्यांनी राज्यातील आमच्या नेत्यांच्या चौकशा लावून त्रास देण्याचे काम केले. त्यामुळे त्यांच्यासोबत जिल्ह्यात एकत्र कसे यायचे? याचा विचार करून काँग्रेस व आमच्या वरिष्ठ नेत्यांनी निवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढण्याचे आदेश दिले. त्यामुळे भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला, हा भाजपाचा आरोप निरर्थक असल्याचेही गुलाबराव देवकर म्हणाले. जिल्हा बँक निवडणुक राष्ट्रवादी, व कॉग्रेस महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढविली जाणार आहे. येत्या दोन दिवसांत जागावाटपाची निश्चिती करून तशी घोषणा करून प्रचारास सुरुवात करणार असल्याची माहितीही देवकर यांनी दिली. वाचा: