दरवाढीचे दणके ; सलग पाचव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेल महागले - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, October 31, 2021

दरवाढीचे दणके ; सलग पाचव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेल महागले

https://ift.tt/3w23KWl
मुंबई : जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाल्याने पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन दरवाढीचा सपाटा लावला आहे. आज रविवारी सलग पाचव्या दिवशी कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेल दरात प्रत्येकी ३५ पैसे वाढ केली. पाच दिवसात पेट्रोल आणि डिझेल १.७५ रुपयांनी महागले आहे. देशभरात आज पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेल प्रत्येकी ३५ पैशांनी महागले. जागतिक कमॉडिटी बाजारात क्रूडचा भाव ८५ डॉलरवर गेल्यानंतर इंधन दरात सातत्याने वाढ होत आहे. आजच्या दरवाढीनंतर मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव ११५.१५ रुपये झाला आहे. दिल्लीत पेट्रोल १०९.३४ रुपये इतके वाढले आहे. चेन्नईत पेट्रोलचा भाव १०६.०४ रुपये आहे. कोलकात्यात एक लीटर पेट्रोल १०९.७९ रुपये इतके वाढले आहे. भोपाळमध्ये साध्या पेट्रोलचा भाव ११८.०७ रुपये असून बंगळुरात पेट्रोल ११३.१५ रुपये झाले आहे. मुंबईत एक लीटर डिझेलचा भाव १०६.२३ रुपये इतका वाढला आहे. दिल्लीत डिझेल ९८.०७ रुपये इतके वाढले आहे. चेन्नईत १०२.२५ रुपये आणि कोलकात्यात डिझेलचा भाव १०१.१९ रुपये प्रती लीटर इतका आहे. भोपाळमध्ये डिझेलचा भाव १०७.५० रुपये असून बंगळुरात डिझेल १०४.०९ रुपये आहे. दरम्यान, जागतिक कमॉडिटी बाजारात शुक्रवारी ब्रेंट क्रूडचा भाव ८४.३८ डॉलर प्रती बॅरलवर स्थिरावला. त्यात ०.०६ डॉलरची वाढ झाली. यूएस डब्ल्यूटीआय क्रूडचा भाव ०.७६ टक्क्याच्या वाढीसह ८३.५७ डॉलर प्रती बॅरल इतका झाला.उत्पादन कमी असल्याने कच्च्या तेलाचा भाव ८५ डॉलर पुढे गेला आहे. २०१४ नंतर तेलाचा हा सर्वाधिक दर आहे.