
दुबई: आयसीसीच्या कोणत्याही स्पर्धेत ही लढत सर्वात मोठी ठरते. युएईमध्ये सुरू झालेल्या आयसीसी टी-२० वर्ल्डकपमध्ये आज रविवारी या दोन्ही संघात सामना होणार आहे. टी-२० क्रिकेटमध्ये २ हजार ४५ दिवसांनी म्हणजेच ५ वर्ष, ७ महिने आणि ५ दिवसांनी या दोन्ही संघात पहिली मॅच होत आहे. वाचा- भारताकडे पाकिस्तानला वनडे आणि टी-२० वर्ल्डकपमध्ये सलग १३व्यांदा पराभूत करण्याची संधी आहे. तर पाकिस्तान आयसीसीच्या स्पर्धेत भारताविरुद्धच्या पहिल्या विजयासाठी प्रयत्न करेल. विजयाचा मौका कोण घेणार हे तीन गोष्टींवर ठरणार आहे. एक पिच, दुसरे महत्त्वाच्या खेळाडूंची कामगिरी आणि तिसरी म्हणजे दबाव होय. वाचा- आयपीएलच्या १४व्या हंगामातील दुसऱ्या टप्प्यात दुबईच्या मैदानावर १५० ते १७० धावा झाल्या होत्या. येथे झालेल्या १३ लढतीत ९ वेळा दुसऱ्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाने विजय मिळवला होता. तर प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांनी फक्त ४ वेळा विजय मिळवला. अर्थात आयपीएलच्या अंतिम लढतीत महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने प्रथम फलंदाजी करून विजय मिळवला होता. वाचा- भारतीय संघात ऑलराउंडर रविंद्र जडेजासोबत दुसरा फिरकीपटू म्हणून वरुण चक्रवर्ती किंवा आर अश्विन यांना संधी दिली जाऊ शकते. पाकिस्तान संघाने सामन्याच्या एक दिवस आधीच १२ खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. आता यापैकी शोएब मलिक, मोहम्मद हफीज आणि हैदर अली यापैकी कोणाला बाहेर ठेवले जाते हे पाहावे लागले. मलिक आणि हफीज यांच्याकडे अनुभव असल्याने त्यांना संधी मिळण्याची शक्यता अधिक आहे. वाचा- पाकिस्तानचा संभाव्य संघ- बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान, फखर जमान, आसिफ अली, मोहम्मद हफीज, शोएब मलिक, शादाब खान, इमाद वसीम, हसन अली, हारिस राउफ, शाहीन शाह आफरीदी भारताचा संभाव्य संघ- रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली (कर्णधार), सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह या सामन्यातील कोणतीही बाजू पाकिस्तानच्या बाजूने दिसत नाही. भारताने सलग पाच वेळा पाकिस्तानचा टी-२० वर्ल्डकपमध्ये पराभव केला आहे. आंततरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील भारतीय संघाने चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे भारताचे पारडे जड आहे.