म्युच्युअल फंड गुंतवणूक; जाणून घ्या आयटीआय फार्मा आणि हेल्थकेअर फंडाबाबत - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, October 24, 2021

म्युच्युअल फंड गुंतवणूक; जाणून घ्या आयटीआय फार्मा आणि हेल्थकेअर फंडाबाबत

https://ift.tt/3nmubSS
मुंबई : आयटीआय म्युच्यूअल फंडाने ही नवीन योजना बाजारात आणली आहे. या योजनेचा एनएफओ १८ ऑक्टोबर २०२१ ला खुला झालेला असून १ नोव्हेंबर २०२१ ला बंद होत आहे. या योजनेत किमान गुंतवणूक पाच हजार रुपयांची असून त्यानंतर एक रुपयांच्या पटीत गुंतवणूक करता येईल. या फंडाचे व्यवस्थापन प्रदीप गोखले आणि रोहन कोरडे हे संयुक्तपणे सांभाळणार आहेत. फंडातील निधी फार्मा आणि हेल्थकेअर क्षेत्रातील समभागांमध्ये गुंतविला जाणार असून निफ्टी हेल्थकेअर टोटल रिटर्न इंडेक्स या फंडासाठी पायाभूत निर्देशांक राहणार आहे. आयटीआय एप्रिल २०१९ मध्ये कार्यान्वित झालेला असून आत्तापर्यंत या फंडाने गुंतवणूकदारांसाठी तेरा प्रमुख फंड योजना बाजारात आणलेल्या आहेत. या मालमत्ता व्यवस्थापन कंपनीला ( एएमसी) रोख निधीच्या बाबतीत अतिशय सक्षम अशा उद्योगसमुहाचे पाठबळ आहे. आपल्या गुंतवणूकदारांना दीर्घ कालावधीत समाधानाचा अनुभव मिळण्यासाठी अतिशय छोट्या कालावधीत समुहाने आपल्या एएमसीत उच्च कारभार, मनुष्यबळ, प्रक्रिया आणि पायाभूत सुविधा याबाबत उत्तम मापदंड तयार केले आहेत. या फंडाच्या व्यवस्थापनांतर्गत असलेल्या एकुण निधीने (एयुएम) ऑगस्ट २०२१ अखेरीस तब्बल दोन हजार कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. फंडाकडे ३१ ऑगस्ट २०२१ अखेरपर्यंत असलेल्या दोन हजार ३४ कोटी रुपयांपैकी समभाग विभागात तब्बल एक हजार ४६० कोटी रुपयांचे संकलन झालेले आहे, तर हायब्रीड आणि डेट विभागातील योजनांद्वारे अनुक्रमे २३० कोटी आणि ३४४ कोटी रुपये संकलित झालेले आहेत. एकूण मालमत्ता निधी व्यवस्थापनाची ( एयुएम ) भौगोलिक विभागणीसुध्दा विविधांगी आहे. एकूण संकलित निधीत आघाडीच्या पाच शहरातुन ४२.८८ टक्के, त्यानंतरच्या पुढील दहा शहरातून २४.१८ टक्के, त्यापुढील २० शहरांचा हिस्सा १६.०३ टक्के, नंतरच्या ७५ शहरांमधून १३.२८ टक्के तर अन्य शहरांचा हिस्सा ३.६३ टक्के आहे. एनएफओबद्दल बोलताना आयटीआय म्युच्यूअल फंडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि मुख्य गुंतवणूक अधिकारी जॉर्ज हेबर जोसेफ म्हणाले की, कोवीड-१९ मुळे भारतीय फार्मा क्षेत्राला नवीन पाठबळ मिळाले आहे. संशोधनावर आधारित गुंतवणूक आणि मेहनत यांच्याआधारेगुंतवणूकदारांना अद्वितीय गुंतवणुकीचा अनुभव प्रदान करेल, याचा आयटीआय फार्मा आणि हेल्थकेअर फंडाला विश्वास आहे. आमचे फंड घराणे एसक्युएल म्हणजेच सुरक्षेसाठी पुरेसे मार्जिन ( एस), गुणवत्तापुर्ण व्यवसाय ( क्यू) आणि अल्प लिव्हरेज ( एल) या गुंतवणूक पध्दतीचे अनुकरण करते आणि त्याआधारे गुंतवणूकदारांना गुंतवणूकीचा सवोत्तम अनुभव प्रदान करते. अवघ्या अल्प कालावधीत या एमएमसीने वितरकांचे बळकट जाळे उभे केले असून देशभर स्वतःच्या कार्यालयांचे जाळे आहे. सध्या देशभरात आयटीआय म्युच्यूअल फंडाच्या २७ शाखा कार्यरत आहेत.