इंधन भडका ; आज पुन्हा महागले पेट्रोल आणि डिझेल, जाणून घ्या आजचा भाव - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, October 24, 2021

इंधन भडका ; आज पुन्हा महागले पेट्रोल आणि डिझेल, जाणून घ्या आजचा भाव

https://ift.tt/3jxPPSR
मुंबई : जागतिक कमॉडिटी बाजारात कच्च्या तेलाच्या भाव ८५ डॉलरवर गेला आहे. त्यामुळे पेट्रोलियम कंपन्यांनी आज पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलमध्ये वाढ केली. आज पेट्रोल ३५ पैसे आणि डिझेल ३५ पैशांनी महागले. आजच्या दरवाढीनंतर मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव ११३.४६ रुपये झाला आहे. दिल्लीत पेट्रोल १०७.५९ रुपये इतके वाढले आहे. चेन्नईत पेट्रोलचा भाव १०४.५२ रुपये इतका आहे. कोलकात्यात एक लीटर पेट्रोल १०८.११ रुपये आहे. भोपाळमध्ये साध्या पेट्रोलचा भाव ११६.२६ रुपये असून बंगळुरात पेट्रोल १११.३४ रुपये झाले आहे. आज डिझेल ३५ पैशांनी महागले आहे. आजच्या दरवाढीनंतर मुंबईत एक लीटर १०४.३८ रुपये झाला आहे. दिल्लीत डिझेल ९६.३२ रुपये इतका वाढला आहे. चेन्नईत १००.५९ रुपये आणि कोलकात्यात डिझेलचा भाव ९९.४३ रुपये प्रती लीटर इतका आहे. भोपाळमध्ये डिझेलचा भाव १०५.६४ रुपये असून बंगळुरात डिझेल १०२.२३ रुपये झाला आहे. ऑक्टोबरमध्ये पेट्रोल ६.४० रुपयांनी महागले आहे तर मागील २४ दिवसांत डिझेल ७.७० रुपयांनी महागले आहे. पेट्रोलच्या तुलनेत डिझेल दरात मोठी वाढ झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलमध्ये तफावत झपाट्याने कमी होत आहे. चालू आठवड्यात ब्रेंट क्रूडचा भाव ०.९२ डॉलरने वधारून ८५.५३ डॉलर प्रती बॅरल झाला. डब्ल्यूटीआय क्रूडचा भाव १.०९ डॉलरने वधारून ८२.५० डॉलर झाला. गेल्या दोन वर्षात कच्च्या तेलाचा हा सर्वाधिक दर आहे.