दिग्गज खेळाडूकडून झाली मोठी चूक; १ चेंडूवर दिल्या १० धावा - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, October 30, 2021

दिग्गज खेळाडूकडून झाली मोठी चूक; १ चेंडूवर दिल्या १० धावा

https://ift.tt/3BtQ6fJ
शारजाह: विद्यमान टी-२० वर्ल्डकप विजेत्या वेस्ट इंडिजने काल शुक्रवारी बांगलादेशवर रोमांचक विजय मिळवला. दोन्ही संघांनी पहिल्या दोन लढती गमावल्या होत्या त्यामुळे दोघांनाही विजय गरजेचा होता. या सामन्यात अखेरच्या चेंडूवर वेस्ट इंडिजला विजय मिळवता आला. विजयासाठी बांगलादेशला चार धावांची गरज होती पण त्यांना धावा करता आल्या नाहीत. या पराभवामुळे बांगलादेशचे आव्हान जवळ जवळ संपुष्टात आले. शारजाह मैदानावर झालेल्या या लढतीत एक अनोखा प्रसंग घडला. एका चेंडूवर चक्क १० धावा काढल्या. क्रिकेटमधील ही अनोखी घटना कशी, कधी आणि कोणामुळे घडली जाणून घ्या... वाचा- बांगलादेशविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने १४२ धावा केल्या होत्या. ११ षटकात बांगलादेशने ३ विकेट गमावल्या होत्या आणि फक्त ६५ धावा केल्या होत्या. ९ षटकात त्यांना ७८ धावा हव्या होत्या. अशात कर्णधार कायरन पोलार्डने अनुभी ड्वेन ब्रावोला १२वे षटक दिले. त्याने या षटकातील १ चेंडूवर १० धावा दिल्या. षटकातील पहिला चेंडू वाइड टाकला ज्यावर चौकार देखील गेला. त्यामुळे बांगलादेशला ५ धावा मिळाल्या. त्यानंतर टाकलेल्या चेंडूवर लिटन दासने पुल शॉट मारत ४ धावा वसुल केल्या. पुढील चेंडूत ब्रावोने पुन्हा वाइड टाकला. त्यामुळे एका चेंडूवर बांगलादेशला १० धावा मिळाल्या. वाचा- वाचा- रोस्टन चेजच्या ३९ आणि निकोलस पुरनच्या २२ चेंडूतील ४० धावांच्या जोरावर वेस्ट इंडिजने १४२ धावांपर्यंत मजल मारली. बांगलादेशकडून मेहदी हसन, शोरिफुल इस्लाम मुस्तफिजुर रहमान यांनी प्रत्येकी २ विकेट घेतल्या. बांगलादेशकडून लिटन दासने ४४ धावा केल्या. त्यांना विजयासाठी अखेरच्या षटकात १३ धावांची गरज होती. पण बांगलादेशच्या फलंदाजांना या षटकात एकही मोठा शॉट खेळता आला नाही. अखेरच्या चेंडूवर ४ धावांची गरज असताना रसेलने यॉर्कर चेंडू टाकला आणि एकही धाव निघाली नाही. बांगलादेशचा ग्रुप फेरीतील सलग तिसरा पराभव ठरला. याआधी त्यांचा श्रीलंकेने ५ विकेटनी आणि इंग्लंडनी ८ विकेटनी पराभव केला होता.